सूरज चव्हाण आणि DP च्या 'अंगात आलंया', बिग बॉसच्या घरात या अभिनेत्रीने बांधली सूरजला राखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 10:58 AM2024-08-18T10:58:38+5:302024-08-18T10:59:15+5:30

सूरज चव्हाणचे संस्कार त्याच्या प्रत्येक कृतीमधून दिसत आहेत. अभिनेत्रीने राखी बांधल्यावर तो तिच्या पाया पडताना दिसला (suraj chavan, bigg boss marathi 5)

Suraj Chavan and dhananjay powar dp dance angaat alaya song and celebrate rakshabandhan in bigg boss marathi 5 | सूरज चव्हाण आणि DP च्या 'अंगात आलंया', बिग बॉसच्या घरात या अभिनेत्रीने बांधली सूरजला राखी

सूरज चव्हाण आणि DP च्या 'अंगात आलंया', बिग बॉसच्या घरात या अभिनेत्रीने बांधली सूरजला राखी

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर धमाल होताना दिसणार आहे. आज बिग बॉसच्या घरात 'अबीर गुलाल' मालिकेची टीम येणार आहे. या मालिकेतील कलाकार म्हणजेच पायल जाधव, गायत्री दातार आणि अक्षय केळकर हे तिघेजण येणार आहेत. या तिघांसोबत बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य धमाल करताना दिसणार आहेत. याशिवाय सूरज चव्हाण आणि DP चा धमाल डान्सही बघायला मिळणार आहे.

सूरज आणि DP मध्ये डान्सची जुगलबंदी

आज बिग बॉस मराठीच्या घरात भाऊच्या धक्क्यावर कल्ला होणार आहे. यावेळी रितेश म्हणतो, "असं कोण आहे जो नॉर्मल दिसतो पण अचानक त्याच्या अंगात येतं." हे म्हणताच DP सूरजचं नाव घेतो. पुढे सूरज आणि DP 'अंगात आलंया' या गाण्यावर डान्स करतात. सूरज बेभान नाचतो. त्याला DP ची तगडी साथ मिळते. दोघांच्या डान्सचा आनंद रितेशभाऊ घेताना दिसतो. 


 


पायलने बांधली सूरजला राखी

आज बिग बॉस मराठीच्या घरात 'अबीर गुलाल' मालिकेची टीम भेटीला येणार आहे. यावेळी मालिकेतील श्री अर्थात अभिनेत्री पायल जाधवने सूरजला खास राखी बांधली. "मला तुझा खूप अभिमान वाटतो", असं म्हणत पायलने सूरजला राखी बांधली. इतकंच नव्हे तर राखी बांधल्यावर सूरज पायलच्या पाया पडला. ही कृती सर्वांना आवडली. अशाप्रकारे या आठवड्यात खऱ्या अर्थाने सूरजच्या खेळाचं कौतुक झालेलं दिसलं.

Web Title: Suraj Chavan and dhananjay powar dp dance angaat alaya song and celebrate rakshabandhan in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.