चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:20 PM2024-10-10T12:20:27+5:302024-10-10T12:26:06+5:30

बिग बॉसच्या घरात ७० दिवस राहून आल्यानंतर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण होत आहे.

Suraj Chavan feeling unwell in this hectic schedule ankita walawalkar comments | चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi Season 5) विजेता सूरज चव्हाणवर (Suraj Chavan) सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. सूरजने आधी जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. नंतर तो त्याच्या बारामतीतील गावी पोहोचला. तिथे त्याची विजयी रॅली काढण्यात आली. यानंतर त्याला त्याच्या शाळेलाही भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान सूरजचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चाहत्यांच्या गोतावळ्यात त्याची तब्येत बिघडलेली दिसत आहे.

सूरज चव्हाणला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. गावात त्याची रॅली काढण्यात आली. त्याच्यावर गुलाल उधळण्यात आला. चाहत्यांच्या गोतावळ्यात सूरजची मात्र तब्येत बिघडली. त्याचं डोकं दुखायला लागलं. दोन जणांनी त्याला गर्दीतून बाजूला नेलं. ७० दिवस घरात राहून आल्यानंतर सर्व सदस्यांना पुन्हा नॉर्मल वातावरणात जुळवून घ्यायला वेळ लागत आहे. सूरजलाही अडचणी येत आहे. म्हणूनच त्याची तब्येती बिघडली. 


सूरज चव्हाणचा या व्हिडिओवर अंकिता वालावलकरने कमेंट करत लिहिले, "आम्ही अशा वातावरणातून आलोय की मला स्वत:ला त्रास होतोय नॉर्मल सिटी लाईफचा...त्याला खरंच सांभाळायची गरज आहे आम्ही हेल्पलेस आहोत. पण बिग बॉस हाऊस मधून येऊन बाहेर डील करताना थोडे दिवस आराम लागतो. देवाक काळजी."

सूरज लवकरच आगामी 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार आहे. केदार शिंदेंनी सिनेमाची घोषणा केली आहे. तसंच आदर्श शिंदेंनी त्याच्यासाठी गाणंही बनवलं आहे. बिग बॉस जिंकताच सूरज चव्हाणचं नशीबच पालटलं आहे.

Web Title: Suraj Chavan feeling unwell in this hectic schedule ankita walawalkar comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.