"ट्रॉफी मिळाली पण त्यांनी..."; बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:46 AM2024-10-08T10:46:09+5:302024-10-08T10:47:14+5:30

बिग बॉसची ट्रॉफी हातात मिळाल्यावर काय घडलं याचा खुलासा सूरजने केलाय (suraj chavan, bigg boss marathi 5)

Suraj Chavan talk about what happened after winning Bigg Boss Marathi 5 trophy | "ट्रॉफी मिळाली पण त्यांनी..."; बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणने व्यक्त केली खंत

"ट्रॉफी मिळाली पण त्यांनी..."; बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणने व्यक्त केली खंत

बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाण झालाय. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालाय. सामान्य माणसंच नव्हे तर राजकीय व्यक्तींकडूनही सूरजचं  चांगलंच कौतुक होतंय. सूरज बिग बॉसचा महाविजेता झाल्यावर त्याने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिलीय. त्यावेळी सूरजने त्याच्या मनातली एक खंत व्यक्त केली. बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळाल्यावर काय घडलं याचा खुलासा सूरजने केलाय.

ट्रॉफी जिंकली पण.. सूरजची खंत

सूरजने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "लय आनंदाचा क्षण होता तो. बिग बॉसची ट्रॉफी माझ्या हातात आली आणि मला असा जोश आला होता ना. लय नाचावंसं वाटत होतं त्या टायमिंगला. पण नाचूनच नाही दिलं. गाणंच नाही लावलं. जाऊद्या. आता काय करायचं. पण भाऊचा धक्का लागला तेव्हा नाचलो. रितेश सरांचं गाणं आहे ना भाऊचा धक्का, त्यावर मी लय नाचलो. कारण मी बाहेर गेलो ना की आमच्या बिग बॉसच्या या गाण्यावर मी लय व्हिडीओ करणार."


सूरज चव्हाण बिग बॉसचा महाविजेता

बिग बॉस मराठीच्या फिनालेमध्ये अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. याशिवाय इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. 

Web Title: Suraj Chavan talk about what happened after winning Bigg Boss Marathi 5 trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.