बिग बॉस मराठी २ : घरात सुरेखा पुणेकर पडल्या एकट्या ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:50 PM2019-07-05T14:50:45+5:302019-07-05T14:53:23+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला समस्या आहेत, इतरांचे वागणे खटकत आहे, भांडण होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत.

Surekha punekar feel alone in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : घरात सुरेखा पुणेकर पडल्या एकट्या ?

बिग बॉस मराठी २ : घरात सुरेखा पुणेकर पडल्या एकट्या ?

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला समस्या आहेत, इतरांचे वागणे खटकत आहे, भांडण होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कधी कधी यासगळ्या गोष्टी असह्य होतात आणि कोणाकडे तरी मनमोकळ करण्याची इच्छा होते. बऱ्याचदा सदस्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे या गोष्टी बोलून तर कधी कॅमेरासमोर बोलून मनं हलक करतात. असचं काहीसं सुरेखाताईना वाटू लागले आहे आणि त्यांनी त्यांचे मन अभिजीत केळकर आणि शिवकडे मोकळ केलं. त्याच झाल असे काल वीणा आणि शिवला दिलेल्या टास्कमध्ये सुरेखा ताईनी त्यांच्यासाठी गाणे म्हटले, ते गाण प्रेक्षकांना खूप आवडेल पण यांची खूप जळायला लागली आहे.

वीणा आणि त्यांचं आता खूप भांडण होणार, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर अभिजीत म्हणाला, आता भांडायचे. तोंडावर सांगायचे जे काही केले ते. शिवचे देखील म्हणणे पडले “काय नाटक सुरु आहे”? सुरेखाताई म्हणाल्या, मी मला जे वाटते ते कॅमेराला सांगणार होते पण तुम्हाला बघितलं वाटले मन मोकळ करावं, म्हणून मी तुमच्याजवळ आले. सुरेखाताईना शिव आणि अभिजीत बरोबर बोलत असताना अश्रू अनावर झाले. खूप वाईट वाटत आजकलच्या मुली इतक्या हुशार कशा होऊ शकतात ? आम्हांला नाही का हुशारी ? पण आपण म्हणतो जाऊ दे पोरी आहेत. रात्रीपासून सगळ काम मी केलं, संपूर्ण स्वयंपाक मी बनवला. तांदूळ वाटायचे होते ते पण किशोरीला आले नाही, त्या रुपालीन करून दिलं... आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे येणार...”

Web Title: Surekha punekar feel alone in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.