बिग बॉस मराठीच्या घरात राहिल्यामुळे सुरेखा पुणेकर यांना वाटतेय 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 06:59 PM2019-07-05T18:59:59+5:302019-07-05T19:02:16+5:30

बिग बॉसच्या घरात गेल्या अनेक आठवड्यांपासून बंदिस्त असल्याने आता घरातील काही सदस्य काहीशा विचित्र गोष्टी करू लागले आहेत.

Surely, Surekha Punekar is afraid that Big Boss can happen in Marathi's house | बिग बॉस मराठीच्या घरात राहिल्यामुळे सुरेखा पुणेकर यांना वाटतेय 'ही' भीती

बिग बॉस मराठीच्या घरात राहिल्यामुळे सुरेखा पुणेकर यांना वाटतेय 'ही' भीती

googlenewsNext
ठळक मुद्देएवढे दिवस आतमध्ये आहोत आपण... भूताटकीसारखं प्रकरण आहे हे... बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अनेक गोष्टी मी विसरायला लागले आहे. अरे मला एकही गाणे आठवत नाहीये... माझी लावणी मला आठवायला तयार नाहीये.

सुरेखा पुणेकर सध्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात त्या स्पर्धक असून या कार्यक्रमामुळे त्या खऱ्या आयुष्यात कशा आहेत हे प्रेक्षकांना जाणून घेता येत आहेत. आज त्यांना ओळख ही त्यांच्या लावणीमुळे मिळाली आहे. सुरेखा पुणेकर यांनी आज लावणीसमाज्ञी म्हणून आपली एक ओळख निर्माण केली. पण बिग बॉसच्या घरात राहात असताना एक भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

बिग बॉसच्या घरात गेल्या अनेक आठवड्यांपासून बंदिस्त असल्याने आता घरातील काही सदस्य काहीशा विचित्र गोष्टी करू लागले आहेत. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नव्या क्लिपमध्ये आपली सर्वांची आवडती लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी त्यांना एका गोष्टीची भीती वाटत असल्याचे कबूल केले. 

बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्या घरातील इतर सदस्यांसोबत गमतीजमती करत आहेत. पण या घरात राहिल्यानंतर आपण बाहेरच्या जगातील गोष्टी विसरू असे सुरेखा पुणेकर यांना वाटायला लागले आहे. त्या घरातील सदस्यांसोबत बोलताना दिसत आहेत की, “एवढे दिवस आतमध्ये आहोत आपण... भूताटकीसारखं प्रकरण आहे हे... बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अनेक गोष्टी मी विसरायला लागले आहे. अरे मला एकही गाणे आठवत नाहीये... माझी लावणी मला आठवायला तयार नाहीये. मला जर सांगितलं की, ‘पिकल्या पानाचा’ ही लावणी म्हणा तर सुरुवातच मला आठवत नाही. अजून आठ आठवडे तर मी घरात राहिले तर मला घरची माणसं सुद्धा आठवायची नाहीत. विसरायला होणार आपल्याला इथे राहून, नॅचरल आहे हे.”

खऱ्या आयुष्यातील एक घटना सांगताना सुरेखा पुणेकर यांनी आपल्या बहिणीसोबत घडलेला एक किस्सा सांगितला. त्यांच्या बहिणीचे अपहरण झाल्यानंतर तिला स्मृतीभ्रंश झाला होता. यावर डॉक्टरांचे काय म्हणणे काय होते त्‍याबाबत पुणेकर म्हणाल्या, “ते म्हणाले होते की, एका जागेवर राहून आणि सतत तोच तोच विचार करून त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला होता.”


 
सुरेखा ताईंचे हे बोलणे ऐकल्यावर सगळेच जण जरा धास्तावले... पण त्यावर सुरेखा यांनी लगेचच स्पष्टीकरण दिले, “तसं आपलं होणार नाही... घाबरू नका...” 

Web Title: Surely, Surekha Punekar is afraid that Big Boss can happen in Marathi's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.