स्वामी ओमने या नेत्याविरुद्ध लढली होती निवडणूक, डिपॉझिट झाले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 05:49 PM2017-01-12T17:49:47+5:302017-01-12T17:49:47+5:30

बिग बॉस शोमधून चर्चेत आलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओमचे कारनामे सांगावे तेवढे कमी आहेत. त्यामुळेच ते घरात जेवढे चर्चेत ...

Swami Omne contested the election against the leader, deposited in deposit | स्वामी ओमने या नेत्याविरुद्ध लढली होती निवडणूक, डिपॉझिट झाले जप्त

स्वामी ओमने या नेत्याविरुद्ध लढली होती निवडणूक, डिपॉझिट झाले जप्त

googlenewsNext
ग बॉस शोमधून चर्चेत आलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओमचे कारनामे सांगावे तेवढे कमी आहेत. त्यामुळेच ते घरात जेवढे चर्चेत होते, तेवढेच बाहेरच्या दुनियेतही चर्चेत आहेत. बिग बॉसचा होस्ट सलमान खान आणि निर्मात्यांवर आरोपांची सरबत्ती करणाºया स्वामी ओमचे अनेक कारनामे आता बाहेर येत आहेत. म्हणे स्वामी ओमने दिल्लीची गेली विधानसभा निवडणूक एका दिग्गज नेत्याच्या विरोधात लढली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 



हिंदू महासभेशी संबंधित असलेले स्वामी ओम हे नाव बाहेरील दुनियेत जबरदस्त वादग्रस्त आहे. दिल्लीच्या बहुतेक पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर त्यांचे नाव नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेतही राहिले आहे. त्यांनी हिंदू महासभेच्या तिकिटावर दिल्लीच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अन् ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र त्यावेळेस दिल्लीत आपची स्थिती पाहता स्वामी ओमचे अपेक्षेप्रमाणे डिपॉझिट जप्त झाले होते.



त्यावेळी प्रचारकाळात त्यांच्याकडून वाट्टेल ते आरोप केले गेल्याने माध्यमांमध्ये स्वामी ओम चर्चेचा विषय बनले होते. आता बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर त्यांची आजवरची जंत्रीही लोकांसमोर येत आहे. ते सध्या भाजपाचे गोडवे गात असल्याने त्यांचे पॉलिटीकल कनेक्शन समोर येत आहे. स्वामी ओम हे नाव बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सिझनमधील सर्वाधिक वादग्रस्त नाव ठरले आहे. घरात गलिच्छ वर्तणुकीमुळे त्यांची बिग बॉसने हकालपट्टी केली होती. 

राष्ट्रीय संत परिषद ओमला ‘ढोंगीबाबा’ म्हणून करणार घोषित
 बिग बॉसच्या घरात स्वामी ओमची नानारूपे बघावयास मिळाली. कधी नॉनव्हेजवर ताव मारताना तर कधी अश्लील गोष्टी करताना त्यांना राष्ट्रीय चॅनेलवर बघण्यात आले आहे. एक संत म्हणून त्यांच्यात कुठलेच गुण दिसले नसल्याने घरातील सदस्य त्यांना वारंवार ढोगीबाबा असे संबोधित असत. शिवाय त्यांच्या वर्तणुकीतूनही हे स्पष्टपणे दिसून आले आहे. हाच धागा पकडून राष्ट्रीय संत परिषद त्यांना या आठवड्यात ‘ढोगीबाबा’ म्हणून घोषित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता असे झाल्यास स्वामी ओम त्यास कशापद्धतीने उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरेल. त्याचबरोबर स्वामी ओमने बिग बॉसच्या २८ जानेवारी रोजी होणाºया ग्रॅण्डफिनालेमध्ये गोंधळ घालणार असल्याची धमकी दिल्याने ते काय कारनामा करतील की त्यांची धमकी पोकळ ठरेल, हेही बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Swami Omne contested the election against the leader, deposited in deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.