'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये पाहायला मिळणार स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:04 IST2025-01-30T17:03:33+5:302025-01-30T17:04:59+5:30

Jai Jai Swami Samartha Serial : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन अनुभवायला मिळणार आहे.

Swami's supernatural Ganesh darshan will be seen in the series 'Jai Jai Swami Samarth' | 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये पाहायला मिळणार स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये पाहायला मिळणार स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन

जय जय स्वामी समर्थ मालिके(Jai Jai Swami Samartha Serial)मध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन अनुभवायला मिळणार आहे. यंदाचा माघी गणेशोत्सव स्वामी भक्तांसाठी अलौकिक पर्वणी ठरणार आहे. स्वामींचे अलौकिक असे प्रत्यक्ष गणेशरुप दर्शन घराघरात घडणार आहे, निमित्त आहे,जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या माघी गणेश जयंती विशेष भागाचे. 

अक्कलकोट मधल्या एका अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या घरात स्वामी प्रवेश करतात आणि घोषित करतात की यंदा माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा करायचा. आधीच गरिबीत असलेल्या दोन मुलांचा कसाबसा सांभाळ करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रमुख गयावया करतो, स्वामी हे कसे शक्य आहे, आमचे हातातोंडावर पोट आहे. आम्ही या आधी गणपती कधीच घरी आणला नाही. स्वामी म्हणतात देव तुम्ही आणता हा गैरसमज आहे, देव त्याच्या मर्जीने येतो. गणपतीची मूर्ती स्वत:हून चालत येईल. 


स्वामी असे का म्हणतात, या कुटुंबाच्याच बाबतीत स्वामी ही लीला का घडवतात आणि विघ्नहर्त्याचे स्मरण का करवतात,याची भक्तांना भक्तीचा खरा मार्ग दाखवणारी अत्यंत रंजक गोष्ट या भागात उलगडते. स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन हा भक्ती आणि श्रद्धेचा परमोच्च बिंदू येत्या रविवारी २ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठीवर अनुभवता येईल. 
 

Web Title: Swami's supernatural Ganesh darshan will be seen in the series 'Jai Jai Swami Samarth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.