अमृता देशमुख-प्रसाद जवादेनंतर स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी यांचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:52 AM2023-07-24T08:52:48+5:302023-07-24T09:17:54+5:30

आमचं ठरलंय म्हणत स्वानंदीने दिली होती प्रेमाची कबुली.

Swanandi tikekar and ashish kulkarni are now officially engaged see photo | अमृता देशमुख-प्रसाद जवादेनंतर स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी यांचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

अमृता देशमुख-प्रसाद जवादेनंतर स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी यांचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

googlenewsNext

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अलिकडेच तिने आमचं ठरलं म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा पासूनच दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर २३ जुलैला पुण्यात साखरपुडा पार पडलाय. इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णीसोबत स्वानंदीचा साखरपुडा झाला.

स्वानंदी साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. समीर चौघुले, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, शरयू दाते, श्रेया बुगडे, यशोमन आपटे इत्यादी कलाकार मंडळींनी कमेंट करत दोघांचेही कौतुक केले आहे. साखरपुड्यामध्ये स्वानंदी आणि आशिष यांनी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळतंय. फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. 


आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. स्वानंदीच्या होणाऱ्या पतीआशिष कुलकर्णीने 'इंडियन आयडॉल १२' गाजवले होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने सर्वांचंच मन जिंकलं होतं. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायली आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. 

दरम्यान स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. झी मराठीच्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती. 

Web Title: Swanandi tikekar and ashish kulkarni are now officially engaged see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.