स्वानंदी टिकेकरला मिळणार सुकन्या कुलकर्णींची साथ, “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:22 AM2022-11-22T11:22:04+5:302022-11-22T18:24:16+5:30

झी मराठी (Zee Marathi)वर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

swanandi tikekar and sukanya mone's new serial Aga aga sunbai kay mhanta sasubai | स्वानंदी टिकेकरला मिळणार सुकन्या कुलकर्णींची साथ, “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वानंदी टिकेकरला मिळणार सुकन्या कुलकर्णींची साथ, “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

गेल्या काही महिन्यात झी मराठी  (Zee Marathi)या वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यात. अर्थात टीआरपीच्या रेसमध्ये टिकायचं तर हे गरजेचं आहे. आता या यादीत आणखी एक नव्या मालिकेचं नाव सामील झालं आहे. झी मराठीवर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे. “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?” )(aga aga sunbai kay mhanta sasubai)असं या मालिकेचं नाव आहे. 

आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय किंवा आईला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय, एकदा मुलगी सून झाली की तिच्यासाठी आपली आई सासूच असते. सासूची आई होणं तसं दुरापास्तच. अशाच एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासू मधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे "अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई" आजच्या आधुनिक काळात, सासू सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास यात बघायला मिळेल. "तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना" असं हे दोघींमधलं नातं वेगेवगळ्या प्रसंगातून धमाल उडवत असताना त्यांच्या सासू सुनेच्या नात्यावर सासऱ्यांची खुमासदार टिप्पणी त्या नात्याचे विविध पैलू उलगडून दाखवते. ह्या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी असणार आहेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर.

सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल याची नक्की खात्री वाटते. येत्या  २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: swanandi tikekar and sukanya mone's new serial Aga aga sunbai kay mhanta sasubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.