अरेच्चा! हे कधी ठरलं? स्वानंदी टिकेकर अन् आशिष कुलकर्णीची जोडी जमली; Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:32 PM2023-07-20T12:32:04+5:302023-07-20T12:32:55+5:30

मुग्धा प्रथमेश नंतर आता स्वानंदीनेही 'आमचं ठरलंय' असं सांगून टाकलंय.

swanandi tikekar marathi actress and indian idol fame ashish kulkarni reveals that they are in love | अरेच्चा! हे कधी ठरलं? स्वानंदी टिकेकर अन् आशिष कुलकर्णीची जोडी जमली; Photo व्हायरल

अरेच्चा! हे कधी ठरलं? स्वानंदी टिकेकर अन् आशिष कुलकर्णीची जोडी जमली; Photo व्हायरल

googlenewsNext

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) एका खास कारणाने चर्चेत आहे. स्वानंदीने तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला असून तिचे होणारे 'अहो' कोण आहेत हे पाहिलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. स्वानंदीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे. मुग्धा प्रथमेश नंतर आता स्वानंदीनेही 'आमचं ठरलंय' असं सांगून टाकलंय. तर कोण आहे स्वानंदीचा 'अहो'?

अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती टिकेकर यांची एकुलती एक लेक स्वानंदीने होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखे वाटेल. स्वानंदीसोबत जो दिसतोय तो आहे  'इंडियन आयडॉल १२' गाजवणारा गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni). होय, आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने सर्वांचंच मन जिंकलं होतं. त्याच्या गाण्याला तर तोडच नाही. आशिष कुलकर्णी, सायली कांबळे या मराठमोळ्या गायकांमुळे इंडियन आयडॉल चांगलंच गाजलं होतं. तर हाच आशिष कुलकर्णी आणि आपली स्वानंदी यांचं जमलंय. "'This is us' आमचं ठरलंय" असं कॅप्शन देत स्वानंदीने प्रेमाची कबुली दिली आहे. 

आशिषनेही त्याच्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये स्वानंदीसाठी खास मेसेज लिहिलाय. 'या अप्रतिम मुलीवर प्रेम करण्यात व्यस्त होतो. आमचं ठरलंय. Mine.' असं सुंदर कॅप्शन त्याने लिहिलं आहे. तर स्वानंदीच्या या पोस्टवर संगीत आणि कला क्षेत्रातील अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. मात्र या दोघांची नेमकी भेट कुठे झाली, त्यांचे सूर कधी जुळले असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडलेत. त्यामुळे स्वानंदी लवकरच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Web Title: swanandi tikekar marathi actress and indian idol fame ashish kulkarni reveals that they are in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.