​स्वप्निल जोशी थिरकला माधुरी दिक्षितच्या या गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 01:04 PM2016-12-16T13:04:58+5:302016-12-16T13:04:58+5:30

कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर आतापर्यंत अनेक मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली आहे आणि आता नुकतीच एक बॉलिवूड सेलिब्रेटी ...

Swapnil Joshi Thirakal Madhuri Dikshit on this song | ​स्वप्निल जोशी थिरकला माधुरी दिक्षितच्या या गाण्यावर

​स्वप्निल जोशी थिरकला माधुरी दिक्षितच्या या गाण्यावर

googlenewsNext
ण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर आतापर्यंत अनेक मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली आहे आणि आता नुकतीच एक बॉलिवूड सेलिब्रेटी या सेटवर अवतरली होती. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शिका फरहा खानने कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर येऊन हा गेम खेळला. तसेच तर तिने खूप धमालमस्तीदेखील केली. तिने जिंकलेली रक्कम ती जय वकील फाऊंडेशन या संस्थेला मदत म्हणून देणार आहे.
फरहाने तिथे उपस्थित असलेल्या लोकांसोबत दिलखुलास गप्पादेखील मारल्या. एवढेच नव्हे तर स्वप्निल जोशी आणि फरहा खानने एका गाण्यावर नृत्यदेखील सादर केले. कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू असताना स्वप्निलने फरहासोबत नृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर फरहानेदेखील स्वप्निलला काही नृत्याच्या स्टेप्स शिकवल्या. स्वप्निलने माधुरी दिक्षितच्या हमको आज कल है या गाण्यावर नृत्य सादर केले. यात चक्क स्वप्निल माधुरी दिक्षित बनला होता. यानंतर फरहा खानने काही तिच्या प्रसिद्ध गाण्यावर नृत्य सादर केले. 
फरहा आणि शाहरुख खानच्या मैत्रीविषयी सगळ्यांनाच माहीत आहे. तिने या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से येथे शेअर केले. तसेच फरहा खानने तिच्या लहानपणीच्या आठवणीदेखील सगळ्यांना सांगितल्या. या कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी फरहा सांगते, "मी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर बसूनदेखील हा गेम खेळले होते. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दोघांच्याही समोर हॉटसीटवर बसून खेळताना खूपच मजा आली होती. पण कोण होईल मराठी करोडपतीच्या मंचावर येऊन मला एक वेगळाच आनंद होत आहे. माझे बालपण मुंबईत गेल्यामुळे मराठी संस्कृती मला खूप जवळची वाटते. त्यामुळे या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला."

Web Title: Swapnil Joshi Thirakal Madhuri Dikshit on this song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.