'स्वराज्य रक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 02:48 PM2020-03-09T14:48:50+5:302020-03-09T14:56:21+5:30

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.

swarajya rakshak sambhaji was on number 3 as per barc india report PSC | 'स्वराज्य रक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका

'स्वराज्य रक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका

googlenewsNext
ठळक मुद्देब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात देखील हीच मालिका पहिल्या क्रमांकावर होती.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम दुसऱ्या नंबरवर असून या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेने गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. ही मालिका संपली असली तरी ही मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील यात वादच नाही.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर होती. यंदाच्या आठवड्यात ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.

यंदाच्या आठवड्यात एका नवीन मालिकेने टीआरपी रेसमध्ये एंट्री घेतली आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा, शेवंता, माई यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार पाचव्या क्रमांकावर आहे.

 

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत.


 

Web Title: swarajya rakshak sambhaji was on number 3 as per barc india report PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.