स्वाती चिटणीस सांगतायेत, गेटअपमध्ये नसल्यास फॅन्सचा असा होतो गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:00 IST2019-03-30T20:00:00+5:302019-03-30T20:00:02+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत स्वाती चिटणीस आपल्याला कार्तिकच्या आजीच्या म्हणजेच सुहासिनी गोएंकाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

Swati chitnis interview about journey in Yeh rishta kya Kehlata hai | स्वाती चिटणीस सांगतायेत, गेटअपमध्ये नसल्यास फॅन्सचा असा होतो गोंधळ

स्वाती चिटणीस सांगतायेत, गेटअपमध्ये नसल्यास फॅन्सचा असा होतो गोंधळ

ठळक मुद्देलोक घाबरूनच माझ्या जवळ येतात आणि विचारतात की, तुम्ही ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील दादीची बहीण आहात का त्यावर मी हो असे उत्तर देते. तसेच काही जण तुम्ही या मालिकेतील दादी आहात का असे विचारतात त्यावर देखील मी हो असेच उत्तर देते. 

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक वर्षं मनोरंजन केले आहे. या मालिकेतील अक्षरा, नैतिक, कार्तिक, नैरा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावल्या होत्या. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेली  रिश्ते है प्यार के ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘ये रिश्ता है प्यार का’ ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेची कथा पुढे नेणार आहे. या मालिकेत शाहीर शेख आणि रिया शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत. शाहीर शेखने कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम केले होते. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती तर रिया शर्मा तू सूरज, मैं साँझ पियाजी या मालिकेत झळकली होती. या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग असून प्रेक्षकांना त्यांच्या या मालिकेतील भूमिका देखील प्रचंड आवडत आहेत.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत स्वाती चिटणीस आपल्याला कार्तिकच्या आजीच्या म्हणजेच सुहासिनी गोएंकाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. रिश्ते है प्यार के या मालिकेच्या लाँचिगला स्वाती आवर्जून उपस्थित होत्या. त्यावेळी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी गप्पा मारल्या असता त्यांनी सांगितले, ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत मी एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. मी या मालिकेत नेहमीच पारंपरिक कपड्यांमध्ये दिसायचे. पण खऱ्या आयुष्यात मी खूप वेगळी आहे. मी भारतीय पेहरावासोबतच पाश्चिमात्य कपडे देखील घालते. त्यामुळे मला त्या लूकमध्ये ओळखणे लोकांना खूप कठीण जाते.

मी अनेक वर्षं मराठीत काम केल्याने मी खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे माझ्या मराठी भाषिक फॅन्सना चांगलेच माहीत आहे. पण ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे मला ओळखणारे अमराठी लोक मला या लूकमध्ये पाहून हैराण होतात. मला मॉलमध्ये पाहिल्यानंतर लोक घाबरूनच माझ्या जवळ येतात आणि विचारतात की, तुम्ही ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील दादीची बहीण आहात का त्यावर मी हो असे उत्तर देते. तसेच काही जण तुम्ही या मालिकेतील दादी आहात का असे विचारतात त्यावर देखील मी हो असेच उत्तर देते. 

ये रिश्ता क्या कहलाता नंतर आता रिश्ते है प्यार के या मालिकेत माझी भूमिका काय असणार याबद्दल आम्हाला अद्याप तरी काहीही सांगण्यात आलेले नाहीये. मी आज अनेक वर्षं हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिका गेल्या अनेक वर्षांत खूप बदलल्या आहेत. पूर्वीच्या मालिका या साहित्यावर आधारित असायच्या. पण आताच्या मालिकांचा आणि साहित्याचा काहीही संबंध नाहीये. पण या सगळ्या मालिकांपेक्षा ये रिश्ते मला खूपच वेगळी वाटते. कारण ही मालिका नात्यांवर भाष्य करणारी असून या मालिकेतील व्यक्तिरेखा या केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर मला देखील आपल्याशा वाटतात. हिंदी मालिकेत काम करताना अनेक मराठी लोकांना भाषेचा अडसर जाणवतो. पण मी सत्यदेव दुबेंकडे काम केले असल्याने माझे हिंदी हे अस्खलित आहे.

Web Title: Swati chitnis interview about journey in Yeh rishta kya Kehlata hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.