IND vs PAK मॅच बघायला लेकीसह न्यूयॉर्कला गेल्या अमृता फडणवीस, नेटकरी म्हणाले- "शपथविधी सोडून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:25 PM2024-06-10T13:25:05+5:302024-06-10T13:26:26+5:30
T20 World Cup IND vs PAK : भारत-पाक सामना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस लेक दिविजासह न्यूयॉर्कला गेल्या होत्या. अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन भारत-पाक सामन्याचे फोटो शेअर केले आहेत.
ICC T20 World Cup 2024 IND vs PAK : सध्या सगळीकडे टी २० वर्ल्डकपचा माहौल आहे. रविवारी(९ जून) टी २० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळवला गेलेला सामना रंगतदार झाला.संपूर्ण जगाचं या महामुकाबल्याकडे लक्ष लागलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद ११९ धावा केल्या. त्यामुळे आपण पाकिस्तान विरुद्धचा हा सामना हरतो की काय, अशी चिंता भारतीयांना होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानला केवळ ११३ धावांमध्ये रोखले आणि ६ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला.
भारतीयांसाठी ९ जूनचा रविवार हा खऱ्या अर्थाने खास होता. टी २० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबरोबरच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे रविवार हा भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षणांपेक्षा कमी नव्हता. भारत-पाक सामना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस लेक दिविजासह न्यूयॉर्कला गेल्या होत्या. अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन भारत-पाक सामन्याचे फोटो शेअर केले आहेत.
अमृता यांनी स्टेडियममधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्या मुलगी आणि मित्रमैत्रिणींसह भारत-पाक सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. पण, मोदींचा शपथविधी सोडून अमृता फडणवीस भारत-पाक सामना पाहायला गेल्यामुळे नेटकरी पेचात पडले आहेत. अमृता यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "वाह क्या बात है चक दे इंडिया", "शपथविधी सोडून मॅडम इकडे मॅच पाहायला आल्या", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या विजयात जसप्रीत बुमराह स्टार ठरला. त्याने ४ षटकांत १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिकने ४ षटकांत २४ धावा आणि २ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेत भारताच्या विजयात वाटा उचलला. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आता भारताची गुणसंख्या ४ झाली आहे.