बाप 'बाप' होता है! पाकिस्तानच्या नाकावर टिचून मिळवला विजय, IND साठी पृथ्विक प्रतापची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:48 AM2024-06-10T11:48:57+5:302024-06-10T11:49:48+5:30

IND vs PAK : पाकिस्तानच्या तोंडातील घास हिसकावून दाखवत भारताने विजय मिळवला. त्यांच्या या विजयानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापने खास पोस्ट शेअर केली आहे. 

t20 world cup maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap shared post after ind won against pak by 6 runs | बाप 'बाप' होता है! पाकिस्तानच्या नाकावर टिचून मिळवला विजय, IND साठी पृथ्विक प्रतापची पोस्ट

बाप 'बाप' होता है! पाकिस्तानच्या नाकावर टिचून मिळवला विजय, IND साठी पृथ्विक प्रतापची पोस्ट

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK : रविवारी(९ जून) भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगलेला टी २० वर्ल्डकपमधील सामना अतिशय अटीतटीचा होता. संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या यंदाच्या टी २० वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पैसा वसुल खेळ बघायला मिळाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला सगळे विकेट्स गमावत केवळ ११९ धावा करता आल्या. त्यामुळे भारतीयांनी विजयाची आशाही सोडली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानला केवळ ११३ धावांमध्ये रोखले आणि ६ धावांनी भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. 

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ११९ धावा केल्याने भारतीयांचा हिरमोड झाला होता. पाकिस्तानबरोबरचा सामना गमावणार की काय अशी भीती त्यांना वाटू लागल्याने अनेक पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. पण, भारतीय गोलंदाजांनी मात्र आशा फोल ठरवल्या नाहीत. उत्तम कामगिरी करत पाकिस्तानच्या तोंडातील घास त्यांनी हिसकावून दाखवत भारताला विजय मिळवून दिला. त्यांच्या या विजयानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापने खास पोस्ट शेअर केली आहे. 

पृथ्विकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने इंडियाची नवीन जर्सी घातल्याचं दिसत आहे. हातात बॅट आणि बॉल घेऊन पृथ्विकने इंडियाच्या क्रिकेटर्सला ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे. "हा भाई, तू नॅशनल प्लेयर्सला कसं खेळायचं ते शिकवत होता ना...घे शिकव", असं या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे. या व्हिडिओला त्याने "बाप तो बाप होता है, लव्ह यू इंडिया टीम" असं कॅप्शन दिलं आहे. पृथ्विकच्या या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या विजयात जसप्रीत बुमराह स्टार ठरला. त्याने ४ षटकांत १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिकने ४ षटकांत २४ धावा आणि २ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेत भारताच्या विजयात वाटा उचलला. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आता भारताची गुणसंख्या ४ झाली आहे. 

Web Title: t20 world cup maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap shared post after ind won against pak by 6 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.