टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला गेलेला गौरव मोरे, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:43 PM2024-07-05T12:43:50+5:302024-07-05T12:44:50+5:30

टीम इंडियाची ही विजय यात्रा पाहण्यासाठी आणि खेळाडूंबरोबर जल्लोष करण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेदेखील मरीन ड्राइव्हला गेला होता. हा ऐतिहासिक क्षण त्याने कॅमेऱ्यात कैद केलं आहे. गौरव मोरेने टीम इंडियाच्या विजय यात्रेतील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

t20 world cup victory parade maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared video | टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला गेलेला गौरव मोरे, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मला..."

टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला गेलेला गौरव मोरे, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मला..."

T20 World Cup : टी २० वर्ल्डकप नावावर केल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी(४ जून) मायदेशी परतली. क्रिकेटप्रेमींनी टीम इंडियाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. वानखेडेवर खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केलं. तर टीम इंडियाची विजय यात्रा पाहण्यासाठी आणि आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. टीम इंडियाच्या विजय यात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

टीम इंडियाची ही विजय यात्रा पाहण्यासाठी आणि खेळाडूंबरोबर जल्लोष करण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेदेखील मरीन ड्राइव्हला गेला होता. हा ऐतिहासिक क्षण त्याने कॅमेऱ्यात कैद केलं आहे. गौरव मोरेने टीम इंडियाच्या विजय यात्रेतील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे. "भारतीय असल्याचा अभिमान आहे", असं गौरवने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे. 

गौरव मोरेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रसिद्धी मिळाली. गौरवचं क्रिकेटवर विशेष प्रेम आहे. आयपीएल दरम्यानही गौरव मुंबई इंडियन्सला चिअर करताना दिसला होता. तर वर्ल्ड कप दरम्यानही त्याने अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. दरम्यान, हास्यजत्रेतून प्रेक्षकांची मनं जिंकणार गौरव सध्या मॅडनेस मचाऐंगे या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 
 

Web Title: t20 world cup victory parade maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.