OMG! तारक मेहतामध्ये बेस्ट फ्रेंड्स दाखवलेले कलाकार खऱ्या आयुष्यात बोलत नाहीत एकमेकांशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 15:34 IST2021-03-27T14:56:55+5:302021-03-27T15:34:15+5:30
या मालिकेतील जेठा, दया, तारक, अंजली, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

OMG! तारक मेहतामध्ये बेस्ट फ्रेंड्स दाखवलेले कलाकार खऱ्या आयुष्यात बोलत नाहीत एकमेकांशी
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, तारक, अंजली, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत आपल्याला जेठालालच्या भूमिकेत दिलीप जोशीला तर तारक मेहताच्या भूमिकेत शैलेश लोढाला पाहायला मिळते.
तारक आणि जेठालाल यांची अगदी घट्ट मैत्री असल्याचे आपल्यााल तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पाहायला मिळते. तारक तर जेठालालचा फायर बिग्रेड असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. जेठालालला कोणतीही समस्या असल्यास त्यातून तारकच त्याला बाहेर काढतो.
तारक आणि जेठालाल हे मालिकेत बेस्ट फ्रेंड असले तरी खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी आणि शैलेश लोढा एकमेकांशी बोलत देखील नसल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे. त्यांच्या वृत्तानुसार दिलीप आणि शैलेश केवळ चित्रीकरणासाठी एकत्र येतात आणि चित्रीकरण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून जातात. त्यांच्या दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून अबोला आहे.