'तारका मेहता का उल्टा चष्मा'मधील बबीता जीच्या बोल्ड फोटोशूटवर जेठलालच काय टप्पू ही झाला फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 18:28 IST2021-02-16T18:15:37+5:302021-02-16T18:28:57+5:30
Munmun Dutta share her bold photo : मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.

'तारका मेहता का उल्टा चष्मा'मधील बबीता जीच्या बोल्ड फोटोशूटवर जेठलालच काय टप्पू ही झाला फिदा
टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबीता जी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. 'तारक मेहता का उलटा चश्मा' मधील तिच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक ठसा उमटविला आहे. शोमध्ये जेठालाल बबिता जींसोबत फ्लर्ट आपल्याला पाहायला मिळते, जे लोकांचे खूप मनोरंजन करते. अलीकडेच मुनमुन दत्ताने तिचे लेटेस्ट शिमरी ड्रेसमधले फोटोशूट शेअर केले आहे. यावर टप्पूने कॉमेंट केली आहे.
या फोटोंमध्ये मुनमुन दत्ताने काळ्या रंगाचा शिमेरी ड्रेस परिधान केला आहे आणि लाल रंगाच्या पलंगावर बसली आहे. मुनमुन दत्ताने यात ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे जो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. या फोटोला लाईक करत टप्पू उर्फ राज राज अनादकत याने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. "टप्पू शरारत नही", अशी कॉमेंट राज यांच्या कॉमेंटवर चाहत्यांनी केली.
मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये झाला होता. अभिनेत्री मुनमुन दत्ताचे शिक्षण कानपूर आणि मुंबईतून पुर्ण केले आहे. २००४ साली हम सब बारातीमधून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.