TMKOC: अखेर 'जेठालाल'च्या 'बबिता जी'नं दिली प्रेमाची जाहीरपणे कबुली, कोण आहे 'तो' नशीबवान?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:06 PM2021-12-30T12:06:41+5:302021-12-30T12:08:04+5:30

काही काळापूर्वी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि राज अनाडकट यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही चर्चेला उधाण आले होते.

Taarak mehta ka ooltah chashmah babita munmun dutt fall in love with herself | TMKOC: अखेर 'जेठालाल'च्या 'बबिता जी'नं दिली प्रेमाची जाहीरपणे कबुली, कोण आहे 'तो' नशीबवान?

TMKOC: अखेर 'जेठालाल'च्या 'बबिता जी'नं दिली प्रेमाची जाहीरपणे कबुली, कोण आहे 'तो' नशीबवान?

googlenewsNext

'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील सर्वच व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडतात. खासकरून 'जेठालाल' म्हणजेच दिलीप जोशी (Dilip joshi)  आणि 'बबिता जी' (Munmun Dutta) म्हणजेच मुनमुन दत्ता यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते. अलीकडेच अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) ने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मुनमुन दत्ताने सांगितले आहे की ती कोणावर सर्वात जास्त प्रेम करते. मात्र, ना तर तिने 'जेठालाल'चे नाव घेतले ना 'टप्पू'चे.

मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'तू प्रेमात आहेस का?' असा प्रश्नावर ती म्हणाली, 'माझे स्वतःवर प्रेम आहे'. आता मुनमुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. लोक या व्हिडिओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

काही काळापूर्वी मुनमुन दत्ता  (Munmun Dutta) आणि राज अनाडकट यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही खूप चर्चेला उधाण आले होते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये राज 'टप्पू'ची भूमिका साकारत आहे. या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांवरून मुनमुनला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि अभिनेत्रीला ही गोष्ट आवडली नाही .मुनमुनने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्या जोरदार सुनावलं होतं आणि राजसोबतच्या तिच्या अफेअरची बातमी खोटी असल्याचे सांगितले होते.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah babita munmun dutt fall in love with herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.