TMKOC : आणखी एका लोकप्रिय कलाकाराने शोला ठोकला रामराम ? मालिका सोडण्याचं कारणही आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:03 PM2024-06-21T12:03:13+5:302024-06-21T12:06:04+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीची आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Member Goli aka Kush Shah To Quit The Show After 16 Years? Reddit Post Goes Viral | TMKOC : आणखी एका लोकप्रिय कलाकाराने शोला ठोकला रामराम ? मालिका सोडण्याचं कारणही आलं समोर

TMKOC : आणखी एका लोकप्रिय कलाकाराने शोला ठोकला रामराम ? मालिका सोडण्याचं कारणही आलं समोर

छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजलेला कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah).   हा शो गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमध्ये या वर्षांत अनेक नवे कलाकार सामील झाले, तर अनेक कलाकारांनी हा शो सोडला. यातच पुन्हा मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता आणखी एका कलाकाराने 16 वर्षानंतर शो सोडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या गोकुलधाम सोसायटीतील बच्चे कंपनी तर सगळ्यांनाच माहिती आहे. या मालिकेत बालकलाकारांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.  मालिकेमध्ये गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह (Kush Shah) याने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू होती.  कुशच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. 

Reddit वरची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. गोलीच्या एका चाहत्याची ही पोस्ट आहे.  त्या चाहत्याने गोलीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहलं,  'स्टॅच्यू ऑफ लिबर्टीकडे जात असताना मला गोली भेटला, त्यानं सांगितलं की, तारक मेहता हा शो सोडला असून आता तो न्यूयॉर्कमध्ये शिक्षणासाठी आलाय'.  ही पोस्ट व्हायरल होत आहे. दरम्यान कुशने मालिका सोडल्याबाबत मालिकेच्या टीमने कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही. 

गोली हा टप्पूसेनेतला महत्त्वाचा सदस्य आहे. त्याचा एक वेगळा चाहतावर्गदेखील आहे. तोच आता मालिका सोडणार असल्याचं कळाल्याने कुश शाहचे चाहते नाराज झाले आहेत. मालिकेत कुश शाह 'डॉक्टर हाथी' यांचा मुलगा गोलीची भूमिका साकारत आहे. दरम्यान, कुश शाह हा नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दिसला होता, त्यामुळे तो मालिका सोडतोय, यात किती तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. 
 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Member Goli aka Kush Shah To Quit The Show After 16 Years? Reddit Post Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.