कोरोनामुळे 65 वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी, तरीही 'तारक मेहता'मधील 'बापूजी' करणार शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:45 PM2020-06-03T16:45:13+5:302020-06-03T16:46:01+5:30
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बापूजी वयस्कर असताना कसे काय शूटिंग करणार?, जाणून घ्या याबद्दल
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प आहे. त्यात मालिका व सिनेमाचे शूटिंगही मार्चपासून बंद आहे. आता महाराष्ट्र सरकारने नियमावलीसोबत शूटिंगला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचेही शूटिंग सुरू होणार आहे.
नव्या नियमावलीनुसार, सेटवर कोणताही 65 वर्षांहून जास्त वयस्कर व्यक्ती, गर्भवती महिला किंवा दहा वर्षे लहान मुले, कलाकार किंवा स्टाफचे पार्टनर नसतील. प्रत्येक शूटिंग सेटवर डॉक्टर, नर्स व अम्ब्युलन्स असणं गरजेचे आहे. जर कोणाला कोरोना झाल्याचे कळाल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार व्हायला हवेत.
65 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला जर शूटिंगसाठी परवनागी नाही तर तारक मेहतामधील जेठालालचे बापूजी कसे काय शूट करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. पण बापूजी तेवढे म्हातारे नाही आहेत.
मालिकेतील जेठालालचे बापूजी म्हणजेच चंपक चाचा हा रोल साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अमित भट आहे. अमित जेठालाल साकारणाऱ्या दिलीप जोशीहूनही लहान आहे. अमितचे खरे वय 47 वर्षे आहे.
दिलीप जोशी 52 वर्षांचा आहे. अमितने आपली भूमिका अशी वटवली आहे की, कोणलाच त्याच्या खऱ्या वयाचा अंदाज येत नाही.