Good News! 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'या' दिवशी परतणार दयाबेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:33 IST2019-09-27T18:32:42+5:302019-09-27T18:33:02+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे चाहते दयाबेन कधी परतणार याची वाट पाहत आहेत.

Good News! 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'या' दिवशी परतणार दयाबेन
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. प्रेग्नन्सीमुळे दिशानं काही दिवसांसाठी या मालिकेतून ब्रेक घेतला होता पण या शोमध्ये परतण्यासाठी मात्र तिनं मानधन म्हणून बरीच मोठी रक्कम मागितल्याचं समोर आलं. मात्र मेकर्सनी तिची ही मागणी फेटाळली. त्यामुळे दयाबेन या शोमधून बरेच दिवस गायब आहे. मात्र आता या शोच्या चाहत्यासाठी खूशखबर आहे. लवकरच दयाबेनची या शोमध्ये वापसी होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेन लवकरच परतणार आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच २९ सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरच्या मध्ये दिशाची या शोमध्ये एंट्री होणार आहे.
रिपोर्टनुसार प्रोड्युसर असित मोदी यांनी शेवटी दिशाच्या अटी मान्य करत या शोमध्ये परतण्याची तयारी केली आहे. तसेच दिशानंही प्रोडक्शन हाउसच्या अटी मान्य केल्या आहेत. या आधी पैशावरून दिशा आणि प्रोड्यूसर यांच्यात वाद असल्याचं बोललं जात होतं.
याआधी दिशा वकानीच्या बदली नवी दयाबेन शोधण्याचं काम सुरू होतं. मात्र या भूमिकेसाठी दिशापेक्षा जास्त चांगलं काम करू शकेल असं कोणी सापडली नाही. मात्र नुकत्याच दाखवलेल्या एका एपिसोडमध्ये दिशाच्या परत येण्याची हिंट देण्यात आली आहे. जेठालाल गणेशोत्सवाच्या वेळी दयाबेनला मिस करताना दाखवण्यात आलं आहे. ज्यानंतर लवकरच दयाबेन या शोमध्ये परणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या शोमध्ये काही दिवसांपूर्वी नव्या सोनूची एन्ट्री झाली. त्यानंतर दयाबेन मालिकेत कधी परतणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलं होतं.