Taarak Mehta Ka Ooltah Chashmah दया बेनचे खूप असायचे नखरे, तारक मेहताच्या को-अॅक्टर्सने उघड केल्या काही गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 10:29 IST2019-04-17T10:21:58+5:302019-04-17T10:29:00+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या. मात्र यात दया बेनला रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah दया बेनचे खूप असायचे नखरे, तारक मेहताच्या को-अॅक्टर्सने उघड केल्या काही गोष्टी
सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका खूप चर्चेत आहे. दया बेन अर्थात दिशा वाकानीने मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे रसिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या. मात्र यात दया बेनला रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती. याच मालिकेमुळे ख-या अर्थाने दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. एकीकडे दया बेन आता मालिकेत झळकणार नाही यामुळे रसिक नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे मालिकेतील कलाकारांनीही दयाविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
नुकतेच मिसेस भिडे( सोनालिका जोशी) आणि मिसेस हाती यांना एका मुलाखती दरम्यान दयाबेनला किती मिस करत आहात असा प्रश्न विचारला गेला. त्यावर मिसेस हातीने सांगितले की, दिशाला आम्ही मिस करतो. तर दुसरीकडे मिसेस भिडे साकाराणारी सोनालिका जोशीने सांगितले की, तिचे खूप नखरे असायचे. तिला कधी राग यायचा हे समजायचेच नाही. पण हसत हसत ती राग व्यक्त करायची. त्यावरून समजायचे की, दिशाला कोणत्यातरी गोष्टीचा भयंकर राग आला आहे. तिला तिच्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे तिने मालिका सोडली असली तरी ती पुन्हा मालिकेत झळकेल अशी आशा करूया.
मिसेस सोढीने सांगितले की, दयाची खासियत म्हणजे ती कितीपण थकलेली असली तरी कोणी चाहता तिला सेटवर भेटायला आला असेल तर पहिल्यांदा त्याला भेटायला जायची. सध्या ती तिचे मदरहुड एन्जॉय करत आहे. तिने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे असे मला वाटते.