Guess Who: 'तारक मेहता'मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?, अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:31 IST2022-07-19T14:13:31+5:302022-07-19T19:31:39+5:30
Taarak Mehta ka ooltah chashmah: शाळेच्या गणवेशात पासपोर्ट साईज फोटोमध्ये दिसणार हा क्युट मुलगा आता बराच मोठा झालाय. तारका मेहता का उल्टा चष्मामध्ये तो बरेच वर्ष अभिनय करतोय.

Guess Who: 'तारक मेहता'मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?, अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन
Childhood Photo:गेल्या १२-१३ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah). ही मालिका अनेक कारणांसाठी खास ठरली. उत्तम कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि मालिकेची योग्य पद्धतीने केलेली मांडणी यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच मालिकेतील दयाबेन, जेठालाल, भिडे मास्तर, अय्यर, सोढी आणि डॉ. हाथी या काही भूमिका विशेष गाजल्या. या मालिकेतील दयाबेनची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. तारका मेहतामधील सगळे कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज काही तरी नवीन शेअर करत असतात. . 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या अभिनेत्याचा बालपणीचा फोटो व्हायरल होतोय.
तुम्ही ओळखलंत का याला?
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक क्युट लहान मुलगा दिसत आहे. हा पासपोर्ट आकाराचा फोटो आहे, ज्यामध्ये एक मुलगा शाळेचा गणवेशत दिसत आहे. हा निरागस दिसणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये गोलीची भूमिका साकारणारा कुश (Kush)आहे. कुश लहानपणी खूप क्युट आणि निरागस दिसत होता. आता त्याच्या बालपणीचा हा फोटो व्हायरल होत आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील गोली अर्थात कुशने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. कुशने अनेक वर्षांपूर्वी स्वतःचा हा फोटो शेअर केला आहे. कुश शाह 'डॉक्टर हाथी' यांचा मुलगा गोलीची भूमिका साकारत आहे.