भिडे मास्तरांच्या लेकीचा 'कार'नामा; वयाच्या २६ व्या वर्षी खरेदी केली आलिशान कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:57 PM2024-04-16T12:57:30+5:302024-04-16T12:57:55+5:30

Palak sindhwani: पलकची ही दुसरी कार असून यापूर्वी तिने २०२१ मध्ये तिच्या वडिलांना एक गाडी गिफ्ट केली होती.

taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-palak-sindhwani-buys-new-car-on-26th-birthday-watch-video | भिडे मास्तरांच्या लेकीचा 'कार'नामा; वयाच्या २६ व्या वर्षी खरेदी केली आलिशान कार

भिडे मास्तरांच्या लेकीचा 'कार'नामा; वयाच्या २६ व्या वर्षी खरेदी केली आलिशान कार

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. जवळपास १२-१३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आज आपलासा वाटतो. यामध्येच या मालिकेतील सोनू म्हणजेच अभिनेत्री पलक सिधवानी (Palak sindhwani) हिने वयाच्या २६ व्या वर्षी चक्क कार खरेदी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सगळे जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

'तारक मेहता.. ' या मालिकेत पलकने भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका साकारली आहे. नुकताच पलकने तिचा २६ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी कार खरेदी करत तिने स्वत:लाच बर्थ डे गिफ्ट दिलं आहे. पलकने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या कोऱ्या कारचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पलकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या नव्या कारची पूजा करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे पलकची ही दुसरी कार आहे. यापूर्वी तिने २०२१ मध्ये तिच्या वडिलांना एक कार गिफ्ट केली होती. त्यानंतर आता तिने स्वत:साठी गाडी खरेदी केली आहे.

दरम्यान, नव्या कोऱ्या कारसह व्हिडीओ शेअर करत पलकने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. मी घेतलेली कार फार महागडी नाहीये. पण, माझ्या आईला रुफटॉपची गाडी हवी होती, वडिलांना मोठी गाडी हवी होती. आणि, मला आणि माझ्या भावाला आनंद देणारी गाडी हवी होती. त्यामुळे सगळ्यांच्या आनंदाचा विचार करुन ही गाडी घेतली आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय, असं म्हणत पलकने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 

Web Title: taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-palak-sindhwani-buys-new-car-on-26th-birthday-watch-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.