'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेत्याचा अपघात; थोडक्यात बचावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:48 PM2021-09-14T14:48:55+5:302021-09-14T14:49:51+5:30

Taarak mehta ka ooltah chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

taarak mehta ka ooltah chashmah fame prashant bajaj meets car accident | 'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेत्याचा अपघात; थोडक्यात बचावले प्राण

'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेत्याचा अपघात; थोडक्यात बचावले प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अभिनेता रजत बेदीच्या कारचादेखील अपघात झाला होता

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील टप्पूसेना, सेक्रेटरी भिडे, जेठालाल, सोढी, हाथीभाई, अय्यर अशा अनेक भूमिका साकारुन ही कलाकार मंडळी लोकप्रिय ठरत आहेत. मात्र, या लोकप्रिय कलाकारांपैकी एका अभिनेत्याचा नुकताच अपघात झाला असून त्यातून तो थोडक्यात बचावला आहे.

प्रशांत बजाजचा झाला अपघात

'तारक मेहता का उलटा चश्मा' मालिकेतील अभिनेता प्रशांत बजाजच्या Prashant Bajaj कारचा नुकताच मुंबईतील एमटीएनएल जंक्शनजवळ अपघात झाला आहे. या प्रकरणी प्रशांतच्या गाडीला धडक देणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

"या अपघातातून मी थोडक्यात बचावले त्यामुळे देवाचे मनापासून आभार मानतो. हा अपघात प्रचंड भयानक होता. काही काळासाठी मी माझा पाय गमावलाय असंच मला वाटलं. मी सुन्न झालो होतो. पण, काही लोकांच्या मदतीने मी घरी सुखरुप पोहोचलो. याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली आहे. तसंच माझ्या गाडीला धडक देणारा रिक्षाचालकही सुरक्षित आहे", अशी माहिती प्रशांतने दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता रजत बेदीच्या कारचादेखील अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दोन व्यक्तींचा मृत्यु झाला आहे.
 

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame prashant bajaj meets car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.