‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ’मधील ‘सोनू’ने अवघ्या 23 व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:00 PM2021-11-11T12:00:46+5:302021-11-11T12:03:29+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने नुकतंच स्वत:चं नवीन घर विकत घेतलं. आता भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका साकारणा-या पलकनेही  हक्काचं घर घेतलं आहे.  

taarak mehta ka ooltah chashmah fame sonu aka palak sindhwani moves into new house | ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ’मधील ‘सोनू’ने अवघ्या 23 व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर, पाहा फोटो

‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ’मधील ‘सोनू’ने अवघ्या 23 व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर, पाहा फोटो

googlenewsNext

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) सोनू अर्थात पलक सिंधवानी (Palak Sindhwani) हिने वयाच्या उण्यापु-या 23 व्या वर्षी नवं घर खरेदी केलं आहे. या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने नुकतंच स्वत:चं नवीन घर विकत घेतलं. त्यानंतर आता भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका साकारणाºया पलकनेही  हक्काचं घर घेतलं आहे.  
 पलकने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. घराचा एक फोटोही तिने पोस्ट केला आहे.
‘घरासारखी दुसरी कुठलीच जागा खास नाही. मी नुकतंच माझ्या नवीन घरात राहायला आले,’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.  शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या लिव्हिंग रुममधील टेबलजवळ बसून पोझ देताना दिसतेय.  पलकचं हे नवीन घर आणि त्याचं इंटेरिअर चाहत्यांना खूपच आवडलं आहे.


  
गेल्या काही वर्षांपासून पलक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनूची भूमिका साकारत आहे.   या मालिकेने पलकला एक वेगळी ओळख दिली. 2018 मध्ये पलकने कॉलेजमध्ये मॉडेलिंग स्पर्धा जिंकली होती.

यानंतर तिला ‘द बार’ नामक शॉर्ट फिल्ममध्ये संधी मिळाली. ‘होस्टेज’ या वेबसीरिजमध्येही ती झळकली. पलक रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अडीच लाखावर फॉलोअर्स आहेत. याआधी झील मेहता आणि निधी भानुशाली यांनी मालिकेत सोनूची भूमिका साकारली होती. 

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame sonu aka palak sindhwani moves into new house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.