Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 12:10 PM2022-07-08T12:10:41+5:302022-07-08T12:13:11+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

taarak mehta ka ooltah chashmah finds new dayaben in aishwarya sakhuja | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर!

googlenewsNext

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. बऱ्याच काळापासून चाहते नव्या 'दयाबेन'ची वाट पाहात आहेत. 'दयाबेन' हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) हिने घराघरांत पोहोचवलं. पण दिशानं मालिकेतून एग्झिट घेऊन आता चार वर्ष झाली आहेत. तरीही चाहते आजही दयाबेनचा अनोखा गरबा आणि आवाजाची आठवण काढत आहेत. 

नुकतंच काही दिवसांपूर्वी या मालिकेचे निर्माते असित कुमार यांनी आता दिशाच्या पुनरागमनासाठी आणखी वाट पाहण्यात अर्थ नाही. लवकरच यासाठी नव्या अभिनेत्रीचा शोध घेतला जाईल असं म्हटलं होतं. मालिकेचा एक नवा प्रोमो देखील आला ज्यात जेठालाल दयाबेनच्या पुनरागमनामुळे खूश झालेला दाखवण्यात आलेला आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार दयाबेनसाठी अभिनेत्रीची निवड निश्चित झाली आहे. 

दयाबेनच्या पात्रासाठी ऑडिशन सुरू असून यात निर्मात्यांनी टेलिव्हिजन अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा (Aishwarya Sakhuja) हिच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे.  झूम टेलिव्हिजनच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'ये है चाहते' मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्याचं नाव दयाबेनच्या पात्रासाठी आजमावून पाहिलं जात आहे. दयाबेनचं पात्र साकारण्याची क्षमता असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये ऐश्वर्या सखूजाचंही नाव आहे. इतकंच नव्हे, तर ऐश्वर्यानं ऑडिशनमध्ये दयाबेनच्या भूमिकेत एक जबरदस्त परफॉरमन्स देखील दिला आहे. 

उत्तम कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि मालिकेची योग्य पद्धतीने केलेली मांडणी यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच मालिकेतील दयाबेन, जेठालाल, भिडे मास्तर, अय्यर, सोढी आणि डॉ. हाथी या काही भूमिका विशेष गाजल्या. या मालिकेतील दयाबेनची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे.

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah finds new dayaben in aishwarya sakhuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.