तारक मेहताच्या निर्मात्यांविरोधात FIR दाखल; प्रोड्युसर असितकुमार मोदी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:09 PM2023-06-20T21:09:49+5:302023-06-20T21:10:14+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेतील एका अभिनेत्रीने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: FIR filed against makers of Taarak Mehta; Producer Asit Kumar Modi said... | तारक मेहताच्या निर्मात्यांविरोधात FIR दाखल; प्रोड्युसर असितकुमार मोदी म्हणाले...

तारक मेहताच्या निर्मात्यांविरोधात FIR दाखल; प्रोड्युसर असितकुमार मोदी म्हणाले...

googlenewsNext

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' काही दिवसांपासून वादात आली आहे. मालिकेत काम करणाऱ्या काही कलाकारांनी निर्माते असितकुमार मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. एका अभिनेत्रीने तर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आता पोलिसांनी मोदींविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

एफआयआर नोंदवल्यानंतर शोचे निर्माते असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, “आम्ही सर्व आरोप फेटाळतो. पोलिसांकडे आमचे म्हणणे मांडले आहे. एफआयआर नोंदवला गेला असेल, पण मला याची माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे यावर जास्त भाष्य करणार नाही,'' अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली.

अभिनेत्रीचा तिघांवर आरोप 

मालिकेतील अभिनेत्रीने असित मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रहमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर आरोप केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आरोपांनंतर आयपीसीच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचे पुढे काय होणार, ते पाहणे महत्वाचे आहे.

अनेक कलाकारांनी शो सोडला
या मालिकेत काम करणारे बहुतेक कलाकार पहिल्या भागापासून आतापर्यंत जोडलेले आहेत आणि लोकांना हसवण्याचे काम करत आहेत. पण या 15 वर्षांत नेहा मेहता, भव्य गांधी, शैलेश लोढा, गुरचरण सिंग, राज अनाडकट यांसारख्या मोठ्या नावांसह अनेक कलाकारांनी या शोला अलविदा केला आहे. दया भाभीची भूमिका करणारी दिशा वकानीचेही नाव आहे, जी काही वर्षांपूर्वी प्रसूती रजेवर गेली होती, परंतु अद्याप शोमध्ये परतली नाही.

15 वर्षांपासून मालिका सुरू
तारक मेहता का उल्टा चष्मा या शोबद्दल बोलायचे झाले तर, हा शो 2008 मध्ये टीव्हीवर प्रसारित झाला होता. शो टेलिकास्ट होऊन जवळपास 15 वर्षे झाली आहेत आणि आजही हा लोकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत 3700 हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: FIR filed against makers of Taarak Mehta; Producer Asit Kumar Modi said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.