taarak mehta ka ooltah chashmah : खुशखबर!! अखेर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला मिळाली नवी बावरी, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:39 IST2023-01-13T15:38:52+5:302023-01-13T15:39:37+5:30
taarak mehta ka ooltah chashmah new Bawri : तुम्हीही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'या मालिकेच फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांना लवकरच एक नवं सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर बावरी.

taarak mehta ka ooltah chashmah : खुशखबर!! अखेर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला मिळाली नवी बावरी, कोण आहे ती?
taarak mehta ka ooltah chashmah new Bawri : तुम्हीही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'या मालिकेच फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांना लवकरच एक नवं सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर बावरी. होय, बाघाला वेड लावणारी नवी बावरी मालिकेत पाहायला मिळणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून अनेक वर्षांपासून दयाबेन गायब आहे. बावरीही गायब झाली होती. पण आता मालिकेच्या घसरलेल्या टीआरपीची गाडी रूळावर आणण्यासाठी का होईना, मालिकेत नव्या बावरीची एन्ट्री झाली आहे. नव्या बावरीची भूमिका अभिनेत्री नविना वाडेकर साकारणार आहे. सध्या या नव्या बावरीचे आणि बाघाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बावरीच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींनी ऑडिशन दिलं होतं. पण मेकर्सना फक्त नविना वाडेकर हिच्यातच बावरीचा चार्म दिसला आणि या भूमिकेसाठी नविनाची निवड झाली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बावरी ही बाघाच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. गलती से मिस्टेक हो गयी हा बावरीचा या मालिकेतील संवाद चांगलाच गाजला होता.
याआधी बावरीची व्यक्तिरेखा अभिनेत्री मोनिका भदोरिया ( Monika Bhadoriya) हिनं साकारली होती. मात्र अचानक तिनं ही मालिका सोडली. बावरीनं अचानक मालिका सोडल्यानं चाहते निराश झाले होते. मानधनावरून वाद झाल्यानं बावरीनं मालिका सोडली, अशीही चर्चा होती. मात्र कालांतराने खुद्द मोनिकानं मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं होतं.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं मला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. अगदी जिथं जाईल तिथं मला लोक बावरी नावानं ओळखतात. इतकी लोकप्रिय मालिका का सोडली? असा प्रश्न मला अनेकजण विचारतं आहे. यावरून वेगवेगळ्या चर्चाही माझ्या कानावर येत आहेत. पण खरं सांगायचं तर मालिका सोडण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता. एकाच प्रकारची दिर्घ काळ केल्यामुळे कामात तोचतोचपणा जाणवत होता. काहीही वेगळं करण्यासारखं नसल्यानं मला कंटाळा आला होता. एक कलाकार या नात्यानं मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. गंभीर भूमिका साकारायच्या आहेत. याच कारणासाठी मी मालिका सोडली,असं ती म्हणाली होती.