Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :'जेठालाल' ठरला सर्वाधिक महागडा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:28 PM2020-08-21T19:28:46+5:302020-08-21T19:52:35+5:30

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना सर्वात जास्त मानधन दिले जाते.

Taarak mehta ka ooltah chashmah jethalal actor dilip joshi charge whopping amount as per episode fees | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :'जेठालाल' ठरला सर्वाधिक महागडा अभिनेता

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :'जेठालाल' ठरला सर्वाधिक महागडा अभिनेता

googlenewsNext

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अनेक दशकांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.  लॉकडाऊनंतर जेव्हा पासून या मालिकेचे शूटिंग सुरु झाले आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेतील तशा तर सर्व भूमिका प्रसिद्ध आहे. मात्र जेठालाल या मालिकेची जान आहे असे म्हटलं तर वावगे ठरु नये. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना सर्वात जास्त मानधन दिले जाते.  

दिलीप जोशी गेल्या 12 वर्षांपासून या मालिकेचा भाग आहेत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार दिलीप जोशी हे 50 हजार रुपये मानधन घेतात. ते फक्त 25 दिवस काम करतात या हिशोबाने त्यांचे महिन्याभऱ्याचे मानधन जवळपास 15 लाख लाखांच्या घरात आहे. रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील जेठालाल सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. 

मुळचा गुजरातच्या पोरबंदरचा असलेले दिलीप जोशी सध्या आपल्या परिवारासोबत मुंबईत स्थायिक आहेत. दिलीप जोशी यांना दोन मुलं आहेत एका मुलगा एक मुलगी. त्यांनी 12 वर्षांच्या वयात थिएटर करणं सुरु केले. आपल्या पहिल्या नाटकात दिलीप पुतळ्याची भूमिका मिळाली होती. म्हणजे, 7-8 मिनिटे त्याला केवळ पुतळा बनून उभे राहायचे होते. दोन वेळा इंडियन नॅशनल थिएटर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही त्याने जिंकला आहे. हम आपके हैं कौन, फिर भी दिल है हिंदुस्तानी, खिलाडी 420, वन टू का फोर आणि दिल है तुम्हारा या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah jethalal actor dilip joshi charge whopping amount as per episode fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.