२५ वर्षे चाळीत राहिला, साड्या विकल्या अन्...; असं पालटलं 'तारका मेहता'मधील पोपटलालचं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 02:04 PM2023-08-12T14:04:49+5:302023-08-12T14:08:25+5:30
पोपटलालचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता साड्या विकायचं काम करायचा.
गेल्या १५ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. उत्तम अभिनयामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र गाजलं. या मालिकेतील पोपटलाल तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या मालिकेत आपल्याला पोपटलालच्या भूमिकेत श्याम पाठक यांना पाहायला मिळते. पोपटलाल हा एक पत्रकार असून त्याच्या हातात आपल्याला नेहमी एक छत्री पाहायला मिळते. पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक यांचीही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सेल्समन म्हणून काम करायचा.
२५ वर्ष राहिले चाळीत
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसणारा श्याम पाठक यांचा जन्म एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, असे त्यांनी अनेकवेळा आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे. श्याम पाठ कुटुंबासोबत मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहत होते. आयुष्यातील २५ वर्ष ते चाळीत राहिले. श्याम यांचं अभिनेता होण्याचं स्वप्न होते पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये ते साडीच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करायचे.. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अनेकवेळा जेव्हा त्यांच्या कॉलेजमधील मुली त्याच दुकानात साड्या खरेदीसाठी यायच्या तेव्हा त्यांना लाज वाटायची.
श्याम पाठक यांवू एनएसडीमधून अभिनयचं प्रशिक्षण घेतलं, पण यामागे एक इटरेस्टिंग स्टोरी हे. श्याम यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी सीए व्हावे, पण त्यांचं लक्ष फक्त अभिनयावर होते. त्यांना नाटक फुकट पाहाता याव यासाठी ते दिग्दर्शकाला विनंती करायचे. हळुहळू श्याम पाठक यांनी आपल्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकले. त्यांनी कसा तरी एनएसडीला प्रवेश घेतला. येथे आपले कौशल्य दाखवल्यानंतर त्यांनी मालिकेच्या विश्वात पाऊल ठेवलं. जशोदाबेन जयंतीलाल जोश की ज्वाइंट फैमिली, सुख बाइ चांस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. याच दरम्यान, त्यांना तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पोपटलालची भूमिका मिळाली, ज्याने त्यांचं नशीब पालटलं.