Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ए हालो हालो, दयाबेनची लवकरच मालिकेत वापसी, मेकर्सनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 04:58 PM2021-04-23T16:58:50+5:302021-04-23T17:16:43+5:30

आता दयाबेन या शोमध्ये  कधी परत येणार या सीक्रेटवरुन आता पडदा उठला आहे.

Taarak mehta ka ooltah chashmah producer asit modi revealed when dayaben is returning to the show | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ए हालो हालो, दयाबेनची लवकरच मालिकेत वापसी, मेकर्सनी केली मोठी घोषणा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ए हालो हालो, दयाबेनची लवकरच मालिकेत वापसी, मेकर्सनी केली मोठी घोषणा

googlenewsNext

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  शोचे चाहते दीर्घ काळापासून फक्त दोन प्रश्न विचारत आहेत. पहिला प्रश्न असा आहे की दयाबेन या शोमध्ये कधी परतणार  आणि दुसरा प्रश्न असा आहे की, पोपटलालचे लग्न कधी होणार? आणि आतापर्यंत त्यांना दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. विशेषत: दयाबेनच्या शोमध्ये पुन्हा येण्याला घेऊन बरेच उत्सुक आहेत.  पण आता दयाबेन या शोमध्ये  कधी परत येणार या सीक्रेटवरुन आता  पडदा उठला आहे. शोचे निर्माता स्वत: असित मोदी (Asit Modi)  यांनी हे स्पष्ट केले आहे.


असित मोदींने सांगितले कधी होणार दयाबेनची एंट्री 
शोमध्ये दयाबेनची भूमिका दिशा वाकानी साकारत आहे पण गेली 3 वर्षे ती शोमधून गायब आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. मात्र ती काय पुन्हा आलीच नाही. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार आता असित मोदींनी सांगितले की, कोरोना व्हायरसनंतर दयाबेन शोमध्ये परत येणार आहे. 


कोरोना व्हायरस संपल्यावर होणार शोमध्ये एंट्री 
अलीकडेच निर्माते असित मोदी 'तारक मेहता का उल्टा चश्माच्या' एका एपिसोडमध्ये दिसले होते  ज्यात त्यांनी सांगितले की प्रत्येकजण दयाबेनची वाट पाहत आहे. कोरोना व्हायरस संपताच ते निश्चितपणे परत येईल. चाहत्यांना  आशा आहे की दिशा वाकानी पुन्हा या शोचा एक भाग होईल.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah producer asit modi revealed when dayaben is returning to the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.