TMKOC: अखेर कारण आलं समोर, म्हणून छोट्या टप्पूने सोडली 'तारक मेहता...', असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:28 PM2023-06-20T18:28:50+5:302023-06-20T18:30:43+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेना तर सगळ्यांनाच माहित आहे. मालिका सोडल्यानंतर चाहत्यांनी टप्पूला खूप मिस केले.
छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजलेला कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah). जवळपास १२ ते १५ वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेना तर सगळ्यांनाच माहित आहे. दयाबेन आणि जेठालालचा मुलगा टप्पू म्हणजे गोकुलधाम सोसायटीतील बच्चे कंपनीचा लीडर. खोडकर पण तितकाच हळवा, दयाबेन आणि चंपकलाल आजोबांचा लाडका, भिडे मास्तरांचा कायम ओरडा खाणारा आणि हटके स्टाईलने केस उडवणारा टप्पू डोळ्यासमोर येतो. मालिका सुरु झाल्यानंतर अनेक वर्ष भव्य गांधीने (Bhavya Gandhi) टप्पूची भूमिका साकारली. बऱ्याच जुन्या कलाकारांनी ही मालिका आता सोडली आहे.
गेल्या काही वर्षांत शोच्या कलाकारांमध्ये बरेच बदल झाले आहेत. छोट्या टप्पू उर्फ भव्य गांधीने ज्यावेळी ही मालिका सोडली तेव्हा चाहत्यांना वाईट वाटलं होतं.तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ९ वर्षे काम केल्यानंतर भव्यने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. मालिका सोडल्यानंतर चाहत्यांनी टप्पूला खूप मिस केले.
या कारणामुळे सोडली मालिका
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये टप्पूची भूमिका साकारून भव्याला प्रसिद्ध मिळाली होती. तो एकेकाळी टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारा बालकलाकार होता. चित्रपटात करिअर करण्यासाठी त्याने हा शो सोडला. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, भव्यने एका मुलाखतीत शो सोडण्याबाबत सांगितले. तो म्हणाला होता- लोकप्रियतेमुळे नाही, मी लोकप्रियतेचा कधीच विचार केला नाही. ती आपोआप माझ्यासोबत येते. जर काही केल्याने मला आनंद होत असेल तर मी ते करेन.
भव्या पुढे म्हणाला- मला बाकी काही माहीत नाही. मला फक्त तेच करायचे आहे ज्यासाठी मी आलो आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर भव्यला एका एपिसोडसाठी 10,000 रुपये फी मिळायची.