तारक मेहता का उल्टा चष्माच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी.. दयाच्या भूमिकेसाठी सुरू झाली ऑडिशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:35 PM2019-04-03T13:35:19+5:302019-04-03T13:36:08+5:30

दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशाच्या फॅन्ससाठी अतिशय वाईट बातमी आहे.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' will see a new Dayaben, auditions for the character have begun | तारक मेहता का उल्टा चष्माच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी.. दयाच्या भूमिकेसाठी सुरू झाली ऑडिशन्स

तारक मेहता का उल्टा चष्माच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी.. दयाच्या भूमिकेसाठी सुरू झाली ऑडिशन्स

googlenewsNext
ठळक मुद्देकोणत्याही कलाकाराला रिप्लेस करणे हा निर्णय एक दिवसात घेतला जात नाही. त्यासाठी एक महिना आधीपासूनच कथेवर काम करावे लागते. आम्ही दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशनला सुरुवात देखील केली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे नुकतेच 2700 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. 

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. आता प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशाच्या फॅन्ससाठी अतिशय वाईट बातमी आहे. या मालिकेत दिशा आता परतणार नसल्याची बातमी बॉम्बे टाईम्सने दिली आहे. 

असित मोदी यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मला नवीन दयाबेनचा शोध आता घ्यावा लागणार आहे. कारण कोणताही कलाकार मालिकेपेक्षा मोठा असू शकत नाही. दयाशिवाय तिचे कुटुंब हे अधुरे आहे. त्यामुळे आता एका नव्या चेहऱ्यासोबत या मालिकेची कथा पुढे जाणार आहे. या देशात कामावर जाणाऱ्या अनेक महिला गरोदरपणात मॅटर्निटी ब्रेक घेतात आणि पुन्हा कामावर परततात. आम्ही देखील दिशाला काही महिन्यांचा ब्रेक दिला. पण आता आम्ही तिची वाट पाहू शकत नाही. कोणत्याही कलाकाराला रिप्लेस करणे हा निर्णय एक दिवसात घेतला जात नाही. त्यासाठी एक महिना आधीपासूनच कथेवर काम करावे लागते. आम्ही दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशनला सुरुवात देखील केली आहे. भविष्यात काय होईल याची मला कल्पना नाहीये. पण मी सांगेन की, हा कार्यक्रम चालू राहाणारच आहे. 

 

Web Title: 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' will see a new Dayaben, auditions for the character have begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.