ही चिमुकली गाजवतेय छोटा पडदा, दोन वर्षांनंतर करणार आहे कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 07:15 AM2019-10-07T07:15:00+5:302019-10-07T07:15:02+5:30
ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून एका मालिकेचा भाग असून तिला या मालिकेमुळेच लोकप्रियता मिळाली.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत कधी परतणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशा लवकरच या मालिकेत परतणार असल्याचे म्हटले जात आहे. दिशाच्या फॅन्सना तिला पुन्हा एकदा दयाबेन या भूमिकेत पाहायला मिळत असल्याने सध्या ते चांगलेच खूश आहेत. दिशा मालिकेत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करत असते. तिने काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत दिशा खूपच छान दिसत असून तिने यात चनिया चोली घातली आहे. तसेच केसांची खूप छान वेणी देखील बांधली आहे. तिच्या चेहऱ्यावर आपल्याला खूपच छान हास्य पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडत असून ती या फोटोत खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे.
दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. ती मालिकेत सुरू असलेल्या नवरात्री सेलिब्रेशनच्या दरम्यान मालिकेत कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे.