Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दयाबेन दुसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर व्हायरल झाले बेबी बम्पचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:39 PM2021-12-24T12:39:07+5:302021-12-24T12:42:00+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Disha Vakani : 2017 मध्ये दिशाला पहिली मुलगी झाली आणि मुलीच्या जन्मानंतर ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर परतलीच नाही. आता जवळपास 4 वर्षे झालीत.

Is Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Dayaben pregnant? Photos of baby bumps surfaced | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दयाबेन दुसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर व्हायरल झाले बेबी बम्पचे फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दयाबेन दुसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर व्हायरल झाले बेबी बम्पचे फोटो

googlenewsNext

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील दयाबेन ( Dayaben) अर्थात दिशा वकानी (Disha Vakani) दीर्घकाळापासून शोमधून गायब आहेत. पण अजूनही ती परतेल, ही चाहत्यांची आस कायम आहे.  2017 मध्ये दिशाला पहिली मुलगी झाली आणि मुलीच्या जन्मानंतर ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर परतलीच नाही. आता जवळपास 4 वर्षे झालीत. पण दयाबेनची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आता काय तर दिशाचे  फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि हे फोटो पाहून दिशा दुसऱ्यांदा आई होणार, या चर्चेला उधाण आले आहे.

होय, या व्हायरल फोटोत दिशाचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय. ती हेल्दी दिसत आहे. हे फोटो पाहून कोणी तिला शुभेच्छा देत आहे तर कोणी तिला प्रश्न विचारत आहेत. अर्थात हे दिशाचे हे फोटो ताजे आहेत की जुने हे कळायला मार्ग नाही. कारण दीर्घकाळापासून दिशाचे फोटो समोर आलेले नाहीत. अलीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा जेठालाल अर्थात दिलीप जोशीच्या मुलीचं लग्न झालं. या सोहळ्यालाही दिशा हजर नव्हती. कदाचित प्रेग्नंसीमुळे तिने या सोहळ्याला हजर राहणे टाळलं असावं, असं आता मानलं जातंय. अद्याप दिशाने दुस-या प्रेग्नंसीबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.

 2017 मध्ये दिशा मॅटर्निटी लीव्हवर गेली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. यानंतर प्रेक्षक तिच्या शोमध्ये परतण्याची वाट पाहात होते.  यादरम्यान दिशा व शोच्या निर्मात्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. दिशाचा पती मयूर पढियाने दिशाला दिवसातून फक्त 4 तास आणि महिन्यामध्ये केवळ 15 दिवस कामाची अट ठेवली होती, अशी चर्चा होती.
 

Web Title: Is Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Dayaben pregnant? Photos of baby bumps surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.