तारक मेहता का उल्टा चष्मामधील रोशन म्हणजेच जेनिफरने शेअर केला लग्नातला फोटो, ओळखणे देखील होतंय कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 17:58 IST2021-03-08T17:56:14+5:302021-03-08T17:58:05+5:30
जेनिफरच्या लग्नाचा नुकताच 20 वा वाढदिवस झाला असून तिने तिच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामधील रोशन म्हणजेच जेनिफरने शेअर केला लग्नातला फोटो, ओळखणे देखील होतंय कठीण
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत रोशनच्या भूमिकेत आपल्याला जेनिफर मिस्त्री बन्सिवालला पाहायला मिळत आहे.
जेनिफर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. तिच्या लग्नाचा नुकताच 20 वा वाढदिवस झाला असून तिने तिच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जेनिफर या फोटोत खूपच वेगळी दिसत असून तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. लाल रंगाच्या साडीत जेनिफर खूपच छान दिसत असून या फोटोसोबत तिने तिच्या पतीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 20 वर्षं कधी निघून गेले हे कळलेच नाही असे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून काहीच तासांत 22 हजाराहून अधिक लाईक या पोस्टला मिळाल्या आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.