'तारक मेहता' फेम शैलेश लोढांच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल, वकिलाची भूमिका गाजवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:32 PM2024-10-08T12:32:30+5:302024-10-08T12:33:05+5:30

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील लोकप्रिय अभिनेते शैलेश लोढा यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो भेटीला आलाय (tarak mehta ka ooltah chashma)

Tarak Mehta fame actor Shailesh Lodha new serial advocate anjali awasthi promo out now | 'तारक मेहता' फेम शैलेश लोढांच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल, वकिलाची भूमिका गाजवणार?

'तारक मेहता' फेम शैलेश लोढांच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल, वकिलाची भूमिका गाजवणार?

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका सर्वांच्या आवडीची. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या  मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात एक प्रेमाची जागा निर्माण केलीय. अशातच 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील तारक मेहतांची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा नवीन मालिकेत दिसणार आहेत.

शैलेश लोढांची नवीन मालिका

शैलेश लोढांनी 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेला काही वर्षांपूर्वी रामराम ठोकला. निर्मात्यांशी झालेल्या मतभेदामुळे शैलेश लोढांनी 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका सोडली. या मालिकेनंतर काही महिन्यांच्या ब्रेकनंतर शैलेश यांची नव्या मालिकेत एन्ट्री झालीय. स्टार प्लसवरील 'अॅडव्होकेट अंजली अवस्थी' या मालिकेत शैलेश लोढांची एन्ट्री होणार आहे. शैलेश या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.


शैलेश यांनी तारक मेहता का उलटा चष्मा मालिका का सोडली होती?

शैलेश यांनी काही वर्षांपूर्वी 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेला रामराम ठोकला होता. या मालिकेतील शैलेश यांनी साकारलेली तारक मेहता ही भूमिका चांगलीच गाजली. परंतु नंतर निर्माते असित मोदी यांच्याशी झाले मतभेद, पैशांची थकबाकी अशा अनेक कारणांमुळे शैलेश यांनी 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका सोडली. पुढे शैलेश यांनी निर्मात्यांविरोधात कोर्टात केस दाखल केली. आता शैलेश लोढा यांना नव्या मालिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत

Web Title: Tarak Mehta fame actor Shailesh Lodha new serial advocate anjali awasthi promo out now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.