'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:39 AM2024-07-27T11:39:13+5:302024-07-27T11:39:41+5:30

गेल्या काही वर्षात या मालिकेतील कित्येक कलाकारांनी हा शो सोडला आहे. आता आणखी एका कलाकराने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

tarak mehta ka oolta chashmah kush shah aka goli left show after 16 years | 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो

'तारक मेहता का उलटा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेवर प्रेक्षकही मनापासून प्रेम करतात. पण, गेल्या काही वर्षात या मालिकेतील कित्येक कलाकारांनी हा शो सोडला आहे. आता आणखी एका कलाकराने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. टप्पू सेनामधील गोलीने ही मालिका सोडली आहे. 

टप्पू सेनेने 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ही टप्पू सेना प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटू लागली होती. या मालिकेत गोलीचं पात्र साकारून अभिनेता कुश शहाला लोकप्रियता मिळाली. कुश शहा बालपणापासूनच गोलीची भूमिका साकारत होता. आता तब्बल १६ वर्षांनी त्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. शो सोडल्यानंतर मात्र कुश शहा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 


'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर फेअरवेलचा व्हिडिओ त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता. यामध्ये तो म्हणतो, "मी पाचवीत शिकत असताना या शोचा भाग झालो होतो. आज मी जो काही आहे तो तुम्हा सर्वांमुळे आहे. हा शो सोडून जाताना मला त्रास होत आहे. पण, मी तुम्हाला नक्कीच अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवेन". 

गोलीने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर त्याच्यासाठी शोमधील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. मुनमुन दत्ता, दिलीप जोशी यांनी कुश शाहसाठी भावुक पोस्ट लिहिल्या आहेत. 

Web Title: tarak mehta ka oolta chashmah kush shah aka goli left show after 16 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.