तारक मेहता का उल्टा चष्माचा हा अभिनेता एकेकाळी कमवायचा फक्त 50 रुपये , आज आहे 2 हॉटेलचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:38 AM2020-05-19T11:38:06+5:302020-05-19T11:47:39+5:30

या अभिनेत्याकडे जवळजवळ आठ वर्षं काम नव्हते. तो केवळ पोर्टपोलिओ घेऊन निर्मात्यांकडे चकरा मारायचा.

tarak mehta ka ooltah chashmah abdul aka Sharad Sankla has two hotels in Mumbai PSC | तारक मेहता का उल्टा चष्माचा हा अभिनेता एकेकाळी कमवायचा फक्त 50 रुपये , आज आहे 2 हॉटेलचा मालक

तारक मेहता का उल्टा चष्माचा हा अभिनेता एकेकाळी कमवायचा फक्त 50 रुपये , आज आहे 2 हॉटेलचा मालक

googlenewsNext
ठळक मुद्देया मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाली आणि लोक त्याला अब्दुल या नावानेच ओळखू लागले. या मालिकेनंतर त्याने जुहूमध्ये आणि अंधेरीमध्ये अशी दोन रेस्टॉरंट सुरू केली.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

या मालिकेत अब्दुल ही व्यक्तिरेखा शरद संकला साकरत आहे. शरद गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. पण त्याला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नव्हती. मात्र तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे त्याचे संपूर्ण करियरच बदलले. या मालिकेने त्याला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले. 

शरदने १९९० साली आलेल्या वंश या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यात त्याने चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच छोटीशी होती. त्यावेळी त्याला एका दिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी केवळ ५० रुपये मिळायचे. त्यानंतर त्याने बादशाह, बाजीगर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच हम सब एक है या मालिकेत देखील तो झळकला होता. पण त्याला काही केल्या प्रसिद्धी मिळत नव्हती. 

एक वेळ तर अशी होती की, त्याच्याकडे जवळजवळ आठ वर्षं काम नव्हते. तो केवळ पोर्टपोलिओ घेऊन निर्मात्यांकडे चकरा मारायचा. त्या दरम्यान त्याने असिस्टंट डायरेटक्टर, कोरिओग्राफर एवढेच काय तर कास्टिंग डायरेक्टर म्हणून देखील काम केले. याच दरम्यान त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि शरद एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे त्या दोघांची अनेक वर्षांपासून ओळख होती. त्यामुळे अब्दुल या भूमिकेसाठी त्यांनी शरदला विचारले आणि त्याला ही मालिका मिळाली. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाली आणि लोक त्याला अब्दुल या नावानेच ओळखू लागले. या मालिकेनंतर त्याने जुहूमध्ये आणि अंधेरीमध्ये अशी दोन रेस्टॉरंट सुरू केली.

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah abdul aka Sharad Sankla has two hotels in Mumbai PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.