'तारक मेहता...' फेम अभिनेत्यालाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:40 PM2024-01-11T16:40:40+5:302024-01-11T16:41:09+5:30
'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम शैलेश लोढा यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळालं आहे.
सध्या सगळीकडे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याची धामधूम पाहायला मिळत आहे. येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा होणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरांचं आमंत्रण देण्यात आलं आहे. आता 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम शैलेश लोढा यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळालं आहे.
शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट लिहिली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा आमंत्रणाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. "प्रभूची याच्यापेक्षा मोठी कृपा काय असू शकते...मी निश्चितच अयोध्यामध्ये होणाऱ्या श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील त्या क्षणांचा साक्षीदार बनेल. आज प्राण प्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे," असं म्हणत शैलेश लोढा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात आधी आमंत्रण मिळालं आहे. अक्षय कुमार, कंगना रणौत, अनुपम खेर, सनी देओल, प्रभास, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांसह अनेक कलाकारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी आमंत्रण मिळालं आहे. २ जानेवारी २०२४ रोजी हा भव्य सोहळा पार पडणार आहे. मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार आहे. या भव्य उद्घाटनसोहळ्याआधी १६ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रम सुरु होतील. 4 हजार साधुसंतसह ७ हजार लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.