सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:23 IST2024-04-30T18:22:57+5:302024-04-30T18:23:48+5:30
अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही.

सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये रोशनसिंग सोढी ही भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही. काही वर्षांपूर्वीच त्यांनी मालिका सोडली होती. मालिकेतील सहकलाकारांनी त्यांच्या बेपत्ता होण्यावर चिंता व्यक्त केली. आता मालिकेत अय्यर ही लोकप्रिया व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तनुज म्हणाले, "मला विश्वासच बसत नाहीए. गुरुचरण ४ वर्षांपूर्वीच मालिका सोडली. त्यानंतर आम्ही फारसे संपर्कात नव्हतो. कधीतरी बोलणं व्हायचं मात्र शेवटचं कधी बोललो ते लक्षात नाही. मी गुरुचरणच्या वडिलांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. पुन्हा त्यांना फोन करुन मी त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. मला आशा आहे गुरुचरण जिथे कुठे असेल सुरक्षित असेल आणि लवकर घरी परत येईल."
नेमकं प्रकरण काय?
तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या ७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. दिल्लीत आईवडिलांची भेट घेतल्यानंतर ते फ्लाईटने परत मुंबईला येणार होते. मात्र ना त्यांनी फ्लाईट पकडली आणि ना ते दिल्लीतील घरी परत गेले. त्यांच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.