'तारक मेहता..'चा 'तो' एपिसोड अन् सोनू भिडेच्या मनावर झाला आघात; अभिनेत्रीचा इतक्या वर्षांनी खुलासा
By देवेंद्र जाधव | Updated: January 11, 2025 11:45 IST2025-01-11T11:44:18+5:302025-01-11T11:45:15+5:30
'तारक मेहता..'चा 'तो' एपिसोड अन् सोनू भिडेच्या मनावर झाला आघात; अभिनेत्रीचा इतक्या वर्षांनी खुलासा (tarak mehta ka ooltah chashmah)

'तारक मेहता..'चा 'तो' एपिसोड अन् सोनू भिडेच्या मनावर झाला आघात; अभिनेत्रीचा इतक्या वर्षांनी खुलासा
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका सर्वांच्या आवडीची. आजही ही मालिका TRP च्या शिखरावर असते. जेठालाल, दयाबेन, अय्यर, बबिता, पोपटलाल हे कॅरेक्टर्स लोकांच्या कुटुंबाचा भाग आहेत. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेच्या सुरुवातीला दिसलेली क्यूट सोनू सर्वांना आठवत असेलच. पुढे सोनूच्या भूमिकेत अनेक अभिनेत्री दिसल्या तरीही मालिकेत सुरुवातीला दिसलेली सोनू प्रेक्षकांची फेव्हरेट आहे. सोनू भिडे म्हणजेच अभिनेत्री झील मेहताने (jheel mehta) 'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या एका एपिसोडमुळे तिच्या मनावर कसा परिणाम झाला याचा खुलासा केलाय.
तो एक एपिसोड आजही सोनूला देतो ट्रॉमा
झीलने एका मुलाखतीत हा खुलासा केला. ती म्हणाली की, "एका एपिसोडमुळे मनावर चांगलाच आघात झालेला. तो एपिसोड म्हणजे टप्पूच्या लग्नाचा. मी त्यावेळी विचार केला होता की, बालविवाह दाखवत असलेली ही मालिका मी का करतेय? मी त्या वेळी माझ्या डोक्यात कशा प्रकारे विचार करत होती हे मला चांगलंच आठवतंय. ते गंमतीशीर आणि काहीसं विचित्र होतं. त्यावेळी मी मालिका स्वीकारण्याच्या माझ्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उमटवलं.
झीलने 'तारक मेहता..' सोडली
तुम्हाला आठवत असेल की, 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये एका एपिसोडमध्ये टप्पूचा बालविवाह दाखवला होता. पण हे जेठालालचं स्वप्न असतं हे नंतर उघड होतं. बालविवाह चुकीचा आहे हे यात सांगण्यात आलं होतं. दरम्यान 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील सोनू भिडेने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली. २०१२ ला झीलने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेला रामराम ठोकला. याशिवाय गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये झीलने आदित्य दुबेसोबत लग्न केलं.