'तारक मेहता का उल्टा चश्मा' पाहून ICUतील रुग्णाच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:24 AM2020-05-14T10:24:48+5:302020-05-14T10:25:46+5:30
दयाबेन व जेठालालला पाहून ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाचा चेहरा खुलला.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. आतापर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीतील सर्व शूटिंगदेखील बंद आहेत. त्यामुळे या काळात पुन्हा जुन्या लोकप्रिय मालिका प्रसारीत केल्या जात आहेत. जवळपास 12 वर्षे अविरत प्रेक्षकांची मनोरंजन करणारी सब टीव्हीवरील मालिकेनं एका रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे. ही मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. ही मालिका पाहून आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण हसायला लागला आणि त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचा फॅन असलेली व्यक्ती ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात होता. त्यांनी मुलाला आयसीयूमधून वॉर्डमध्ये शिफ्ट झ तारक मेहता का उल्टा चश्मा लावण्यास सांगितले. टीव्ही लावल्यानंतर वडिल मालिका पाहत असतानाचा फोटो मुलाने टिपला.
मुलाने पोस्टमध्ये म्हटले की, जेठालाल आणि दया बेन स्क्रीनवर दिसताच वडील हसू लागले. ते ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये असून त्यांनी पहिल्यांदा एक मागणी केली की वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यानंतर आधी तारक मेहता का उल्टा चश्मा लाव. ते शिफ्ट झाले तेव्हा तारक मेहता का उल्टा चश्मा लावताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले.
Thank you for your love. Your love inspire us pic.twitter.com/PC7oiQivLT
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) May 3, 2020
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर याची माहिती निर्माते असित कुमार मोदींपर्यंत पोहोचली. असित कुमार मोदी यांनीही या फॅनच्या प्रेमासाठी आभार मानले आहेत.