तारक मेहता का उल्टा चष्मामधील गडा इलेक्ट्रॉनिक्स आहे मुंबईतील या भागात, बनलेय पर्यटनस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 12:54 PM2021-05-26T12:54:07+5:302021-05-26T13:01:57+5:30
गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान मुंबईत खरेखुरे असून या दुकानाचा मालक गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी हे दुकान भाड्यावर देतो.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील जेठालालचे गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.
गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान मुंबईत खरेखुरे असून या दुकानाचा मालक गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी हे दुकान भाड्यावर देतो. गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे खरे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स असून या दुकानाच्या मालकाचे नाव शेखर गडियार असे आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनंतर त्यांनी या दुकानाचे नाव बदलून गडा इलेक्ट्रॉनिक्स असे ठेवले आहे.
गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान खार येथे असून अनेक वर्षांपासून हे दुकान ते चित्रीकरणासाठी भाड्यावर देतात. भाड्यावर दिल्यानंतर आपल्या दुकानाचे चित्रीकरणादम्यान काही नुकसान होणार नाही ना... याची काळजी त्यांना सुरुवातीला वाटत होती. पण आजपर्यंत कधीच त्यांचे चित्रीकरणादरम्यान नुकसान झालेले नाही. हे दुकान आता पर्यटनस्थळ बनले असून लोक खास हे दुकान पाहाण्यासाठी येतात आणि आवर्जून फोटो काढतात.