तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील हा कलाकार खऱ्या आयुष्यात आहे चार्टड अकाऊंटट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 04:57 PM2018-07-28T16:57:16+5:302018-07-28T16:59:40+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेचे नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला आज दहा वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटललाल सगळ्यांचा लाडका आहे. या मालिकेत तो पत्रकार दाखवण्यात आला असून तुफान एक्सप्रेस या वर्तमानपत्रात तो काम करतो. तो पत्रकार असल्याचा त्याला चांगलाच गर्व आहे. त्याला पत्रकारितेत गोल्डन क्रो अवॉर्ड मिळाला असल्याचे तो सगळ्यांना आवर्जून सांगतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या मालिकेत पत्रकार पोपटलालची भूमिका साकारणारा श्याम पाठक हा खऱ्या आयुष्यात चार्टड अकाऊंटट आहे. श्याम सीए झाला असला तरी या क्षेत्रात करियर करण्याची त्याची इच्छा नव्हती आणि त्यामुळे त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला आणि या क्षेत्राकडे वळला.
श्याम पाठक विषयी आणखी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मालिकेत पोपटलालचे लग्न होत नाहीये, तो गेल्या कित्येक वर्षांपासून मुलगी शोधत आहे असे आपल्याला पाहायला मिळतेय. पण खऱ्या आयुष्यात श्यामचे लग्न झाले असून त्याला तीन मुले देखील आहेत.
श्यामची पत्नी रश्मी ही त्याच्यासोबतच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकत होती. तिथेच त्या दोघांची भेट झाली आणि त्यांनी लग्न केले. नियती, पार्थ आणि शिवम अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.