तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चंपक चाचांचा झाला मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 05:12 AM2017-02-06T05:12:23+5:302017-02-06T10:42:23+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. चंपक चाचा तर आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत ...
त रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. चंपक चाचा तर आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहेत. चंपक चाचा मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना धोती आणि कुर्त्यामध्ये पाहायला मिळतात. त्यांची धोती सांभाळायची स्टाइल तर प्रेक्षकांना खूप आवडते. आता याच चंपक चाचांचा मेकओव्हर होणार असून प्रेक्षकांना ते वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत.
चंपक चाचांचे आता संपूर्ण रूपच बदलणार आहे. नव्या रूपातील हे चंपक चाचा पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे यात काही शंकाच नाही.
चंपक चाचा आता स्टायलिश बनणार आहेत आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या केसाची हेअरस्टाईलदेखील बदलणार आहे. ते आता केसांचा विग घालणार आहेत.
चंपक चाचा एका चांगल्या कारणासाठी त्यांचे रूप बदलणार आहे. एका शाळेतील मुख्याध्यापक गरीब मुलांना शाळेत प्रवेश देत नाहीत. मुलांना शाळेत प्रवेश देताना गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जाते असे त्यांना कळल्यावर ते रूप बदलून त्या शाळेत जाणार आहेत आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना चांगलाच धड़ा शिकवणार आहेत. यात मिसेस. भिडे आणि पोटपलाल त्यांना साथ देणार आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीवर या मालिकेत भाष्य केले जाणार आहे. याबाबत चंपक चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट सांगतो, "माझे हे नवे रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही. एवढ्या दिवसात मला टक्कल असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. आता तर माझ्या या नव्या रूपात माझ्या डोक्यावर केसदेखील आले आहेत. माझ्यासोबतच मिसेस. भिडे आणि पोपटलालदेखील प्रेक्षकांना एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत. मेकओव्हर झाल्यानंतर स्वतःला आरशात पाहून मी स्वतःच खूप खूश झालो होतो."