​तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये स्पेशल व्यक्तींच्या हस्ते होणारा ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 09:45 AM2017-01-24T09:45:25+5:302017-01-24T15:15:25+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे नेहमीच काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच सगळे ...

Taraka Mehta's flag hoisting hoop in the glasses of special people | ​तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये स्पेशल व्यक्तींच्या हस्ते होणारा ध्वजारोहण

​तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये स्पेशल व्यक्तींच्या हस्ते होणारा ध्वजारोहण

googlenewsNext
रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे नेहमीच काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच सगळे सण अतिशय आनंदात साजरे केले जातात. तसेच 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिनदेखील गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच उत्सवात साजरा केला जातो. यंदादेखील प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी गोकुळधाममध्ये सुरू आहे. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत सगळ्याच प्रांतातील लोक राहातात असे दाखवण्यात आले आहे. दरवर्षी या सोसायटीत वेगवेगळे लोक ध्वजारोहण करताना आपल्याला पाहायला मिळतात. यंदा तर गोकुळधाममध्ये खास व्यक्तींना ध्वजारोहणासाठी बोलावण्यात आले आहे. अंध मुलींच्या हस्ते यंदाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणासारखा मान दिल्यामुळे या मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद सगळ्यांना पाहायला मिळाला.
ध्वजारोहण झाल्यानंतर सगळ्या गोकुळधामवासियांनी रंग दे बसंती या चित्रपटातील एका गीतावर नृत्यदेखील सादर केले. यामुळे देशभक्तीवर वातावरण सोसायटीत निर्माण झाले होते. याविषयी या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा जेठालाल सांगतो, "काही खास लोकांच्या हस्ते यंदाचे ध्वजारोहण मालिकेत करण्यात येणार आहे. अंध व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा टीमने घेतलेला निर्णय खूपच चांगला आहे. अंधांना दिसत नसले तरी ते अशी अनेक कामे करतात, जी आपल्यासारख्या धडधाकट व्यक्तीलादेखील करता येत नाहीत. यांच्याकडून खरे तर आपण सगळ्यांनी खूप काही शिकण्याची गरज आहे. आयुष्य हे आनंदाने जगले पाहिजे ही शिकवण हे लोक आपल्याला नकळत देऊन जातात." 



Web Title: Taraka Mehta's flag hoisting hoop in the glasses of special people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.