पिरतीचा वनवा उरी पेटलाच्या सेटवर चाय पे चर्चा, अर्जुन आणि सावीनं बनवला चहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:57 IST2023-01-16T16:45:33+5:302023-01-16T16:57:50+5:30
सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे.

पिरतीचा वनवा उरी पेटलाच्या सेटवर चाय पे चर्चा, अर्जुन आणि सावीनं बनवला चहा
कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या पिरतीचा वनवा उरी पेटला मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत अर्जुनाचा स्वॅग आणि सावीचा तडफदारपणा लोकांची मन जिंकत आहे. सावीची भूमिका रसिका तर अर्जुनची भूमिका इंद्रनील साकारत आहेत. मालिका सुरु होऊन काही दिवसच झाले असून सावी आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. . पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे. मालिकेचे शूट नाशिकमध्ये सुरु आहे.
सध्या सगळीकडेच थंडीचे दिवस सुरु आहेत आणि त्यामुळेच आपल्या अर्जुन आणि सावीने म्हणेजच इंद्रनील आणि रसिकाने मालिकेच्या संपूर्ण क्रुसाठी स्पेशल चहा बनवला. सेटवर सगळेच कलाकार आणि इतर सदस्य या चहाचा आस्वाद घेताना दिसले. एकत्र चहा पिताना सेटवर बऱ्याच गप्पा रंगल्या आपण ते म्हणतो ना "चाय पे चर्चा". सेटवर कलाकार असेच बऱ्याचद धम्माल मस्ती करताना दिसतात.
गरमा गरमा भज्या तळणे असो वा भुट्टा खाणे असो वा वाफाळता चहाचा आस्वाद घेणे असो वा हुरडा पार्टी असो. याचनिमित्ताने सगळ्यांना एकत्र येऊन काही वेळ गप्पा गोष्टी करण्याचा वेळ मिळतो. तेव्हा मालिकेमध्ये काय काय घडेल ? हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.